शहरं
Join us  
Trending Stories
1
'जात नाही, तर आर्थिक निकषांवर आधारित आरक्षण हवे', सुप्रिया सुळेंचे मोठे विधान
2
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
3
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
4
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!
5
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...
6
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
7
आधार कार्डबाबतची 'ही' चूक केल्यास १० वर्षांचा तुरुंगवास! यूआयडीएआयने जारी केले कठोर नियम
8
Viral Video : चीनला पोहोचलेल्या भारतीय व्यक्तीने दाखवलं असं काही की पाहणारेही झाले थक्क! तुम्हीही कमाल बघाच
9
चिंता वाढली! एलियन्स, AI आणि तिसरे महायुद्ध; बाबा वेंगाची 2026 वर्षाबद्दल भविष्यवाणी काय?
10
'आता तुझ्यासोबत राहायचं नाही'; पतीपासून वेगळं राहणाऱ्या 28 वर्षीय महिलेवर अनेकवेळा बलात्कार
11
मनोज जरांगेंच्या बैठकीत मधमाशांचा हल्ला, सहकाऱ्यांनी अंगावर उपरणी टाकून पाटलांना वाचवलं
12
"माझ्याशी लग्न कर, तुला सगळ्या सिनेमात घेईन...", प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने अभिनेत्याला दिलेली ऑफर, नकार देताच करिअर संपवलं
13
हैदराबाद विद्यापीठाच्या निवडणुकीत ABVP चा मोठा विजय; NSUI ला नोटापेक्षा कमी मते...
14
VIRAL : फक्त तिकीटच नाही, तरुणीचे इन्स्टाग्राम अकाऊंटही तपासले! रेल्वेतील टीटीईचा धक्कादायक प्रताप
15
टॅरिफ, H1B व्हिसानंतर अमेरिकेचा आता भारतीय कोळंबीवर डोळा! मच्छीमारांवर संकट येणार?
16
पती, पत्नी आणि तो... वेगळचं प्रकरण! माहेर अन् सासरच्यांनी मिळून केलं विवाहितेचं अपहरण; पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
17
५००० परदेशी लोकांना नोकरीवर बसवले, १६ हजार अमेरिकींना काढले...; ट्रम्प प्रशासनाने H-1B चा पाढाच वाचला...
18
लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या गर्लफ्रेंडची हत्या; सुटकेसमध्ये भरून मृतदेह १०० किमी दूर नदीत फेकला
19
'तुम्ही कुणाला त्रास दिला, तर अजिबात ऐकणार नाही'; अजित पवारांचा इशारा
20
निवडून आलेल्याला २ कोटी मात्र आमदार नसतानाही मला २० कोटी मिळतात; सदा सरवणकरांचं वादग्रस्त विधान

पाच महिन्यांत पोस्ट बॅँकेतून २० कोटींचे व्यवहार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2020 01:26 IST

भारतीय डाक विभाग फक्त पत्र पाठविण्यापुरता मर्यादित राहिला नसून, इंडिया पोस्ट पेमेंट बँकप्रणालीमार्फत गेल्या पाच महिन्यांत दीड लाख ग्राहकांनी २० कोटींचे व्यवहार केले आहेत. तसेच या काळात ३५ हजार नागरिकांनी नवीन खाते उघडले आहेत. पोस्ट बॅँकेचा सर्वाधिक लाभ विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती, रोजगार हमी योजनेच्या मजुरांना झाला आहे.

ठळक मुद्देशिष्यवृत्ती, रोहयो मजुरांना लाभ : पावणेदोन लाख खातेधारक; ३५ हजार नवीन खाती

नाशिक : भारतीय डाक विभाग फक्त पत्र पाठविण्यापुरता मर्यादित राहिला नसून, इंडिया पोस्ट पेमेंट बँकप्रणालीमार्फत गेल्या पाच महिन्यांत दीड लाख ग्राहकांनी २० कोटींचे व्यवहार केले आहेत. तसेच या काळात ३५ हजार नागरिकांनी नवीन खाते उघडले आहेत. पोस्ट बॅँकेचा सर्वाधिक लाभ विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती, रोजगार हमी योजनेच्या मजुरांना झाला आहे.इंडिया पोस्ट पेमेंट बँक सुरू झाल्यापासून नाशिक जिल्ह्णात एकूण १ लाख ७० हजार ग्राहकांनी नोंदणी केली आहे. डाक सेवेचे नाशिक आणि मालेगाव अशा दोन विभागांमध्ये वर्गीकरण करण्यात आले असून, नाशिक विभागात इगतपुरी, त्र्यंबक, पेठ, सुरगाणा, नाशिक, दिंडोरी, सिन्नर आणि काहीअंशी निफाड तालुक्याचा समावेश होतो, तर उर्वरित तालुके हे मालेगाव विभागात येतात. इंडिया पोस्ट पेमेंट बँकेतील आधार संलग्न भुगतान सेवा (एईपीएस)मार्फत ग्राहकांना पोस्टमनद्वारे त्यांच्या घरी जाऊन पेमेंट देण्याची सेवा पोस्ट विभागामार्फत केली जात आहे. ग्रामीण भागातील खातेधारकांना बँकेतून पैसे काढावयाचे असल्यास तालुक्याच्या ठिकाणी पायपीट करावी लागत होती.देशात लॉकडाऊनच्या काळात खातेधारकांना बँकेच्या या सेवेचा चांगला उपयोग झाला असून, पोस्टमन पैसे पोचविण्यासोबतच नागरिकांच्या फोनला रिचार्ज करून देणे, त्यांचे आॅनलाइन वीजबिल भरून देणे आदी महत्त्वाच्या कामांमध्येही मदत करत आहे.डाक विभागातर्फे लवकरच इयत्ता दहावीनंतरच्या विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीसाठी नवीन प्रणाली सुरू करण्यात येणार आहे. जिल्ह्णातील ३७ हजार शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांची यादी शासनस्तरावरून प्राप्त झाली असून, लवकरच जिल्ह्णातील सर्व महाविद्यालयांतील प्रचार्यांसोबत चर्चा करून ही प्रणाली सुरू करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचे पैसे मिळणार आहेत.आदिवासी विकास विभागाकडून सुरू करण्यात येणाऱ्या खावटी योजनेसाठीदेखील या पर्यायाचा विचार सुरू झाला आहे. प्रायोगिक तत्त्वावर जिल्ह्णातील कातकरी आदिवासी समाजाच्या सर्वच नागरिकांचे खाते उघडण्यात आले असून, हा प्रयोग लवकरच राज्यभर अवलंबिला जाणार आहे.महात्मा गांधी रोजगार हमी योजनेमध्ये काम करणाºया मजुरांनादेखील या बँकेमध्ये लवकरच समाविष्ट करून त्यांनादेखील या सुलभ सेवेचा लाभ घेता येणार असल्याचे डाक अधीक्षक मोहन अहिरराव यांनी सांगितले.

टॅग्स :NashikनाशिकPost Officeपोस्ट ऑफिसbankबँक