आॅनलाइन फसवणुकीतील १५ लाख केले वसूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 1, 2020 11:48 PM2020-02-01T23:48:38+5:302020-02-02T00:06:55+5:30

पोलीस महासंचालक सुबोधकुमार जयस्वाल यांच्या उपस्थितीत नुकतीच पोलीस महासंचालक कार्यालयात राज्यातील सर्व परिक्षेत्रांचे प्रमुख पोलीस आयुक्त, अधीक्षक यांची बैठक पार पडली.

2 lakh banana recovered from online fraud | आॅनलाइन फसवणुकीतील १५ लाख केले वसूल

आॅनलाइन फसवणुकीतील १५ लाख केले वसूल

Next
ठळक मुद्दे राज्यात प्रथम : उद्धव ठाकरे यांनी घेतली सहामाही गुन्हे आढावा बैठक; ग्रामीण पोलिसांची कामगिरी

नाशिक : पोलीस महासंचालक सुबोधकुमार जयस्वाल यांच्या उपस्थितीत नुकतीच पोलीस महासंचालक कार्यालयात राज्यातील सर्व परिक्षेत्रांचे प्रमुख पोलीस आयुक्त, अधीक्षक यांची बैठक पार पडली.
या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री अनिल देशमुख उपस्थित होते. इमारतीत सायबर पोलीस ठाणे कार्यरत आहे. या पोलीस ठाण्याचे प्रमुख निरीक्षक सुभाष अनमुलवार, उपनिरीक्षक कल्पेश दाभाडे यांच्यासह नाईक सोनाली पाटील, आरती पारधी, प्रमोद जाधव, परिक्षीत निकम, प्रकाश मोरे, सुनील धोक्रट, विकास टेकुळे, सरिता अक्कर, प्राजक्ता सोनवणे यांचा चमू कार्यरत आहे. तांत्रिक विश्लेषणाच्या माध्यमातून आॅनलाइन फसवणुकीचा छडा लावत या पथकाकडून २०१९ साली दाखल २५ गुन्ह्यांमधील १६ लाख ५० हजारांच्या रकमेपैकी एकूण १५ लाख १६ हजाराची रक्कम पुन्हा मिळविली गेली. ज्या फिर्यादींची फसवणूक झाली होती, त्यांनाही मोठा दिलासा मिळाला आहे. आॅनलाइन फसवणुकीचा प्रकार लक्षात घेत त्यानुसार कायद्याचे निरीक्षण नोंदवित काही गुन्ह्यांत संबंधित बॅँकांना जबाबदार धरत त्यांच्या ग्राहकांची फसवणुकीत गेलेली रक्कम पोलिसांनी मिळवून दिली आहे, असे अधीक्षक डॉ. आरती सिंह यांनी सांगितले. सायबर पोलिसांच्या कामाचा ताण दिवसेंदिवस वाढत आहे. कारण आॅनलाइन पेमेंट अ‍ॅप्लिकेशनचा वाढता वापर अणि आॅनलाइन फसवणुकीचे वाढते प्रमाण यामुळे २०१९ साली
२५ गुन्हे सायबर पोलीस ठाण्यात जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून दाखल झाले.

प्रथम क्रमांक
ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयांतर्गत सुरू असलेल्या सायबर पोलीस ठाण्याने सायबर गुन्ह्यांमधील रोख रक्कम पुन्हा मिळविण्यामध्ये राज्यात प्रथम क्रमांक पटकाविला आहे. सायबर पोलिसांनी २०१९ साली आॅनलाइन सायबर गुन्ह्यांमधील तब्बल १५ लाख १६ हजारांची रक्कम वसूल केली आहे. तसेच सायबर गुन्ह्यांची उकल करण्यामध्ये हे पोलीस ठाणे राज्यात चौथ्या क्रमांकावर आहे.

३३ गुन्हे उघडकीस आणण्यात यश
ग्रामीण सायबर पोलिसांना मागील तीन वर्षांमध्ये दाखल १०९ गुन्ह्यांपैकी तब्बल
३३ गुन्हे उघडकीस आणण्यात यश आले. त्यामुळे हे पोलीस ठाणे राज्यात गुन्हे उघडकीस आणण्याबाबत चौथ्या क्रमांकावर राहिले. २०१९ साली २५ पैकी
१० तर २०१८ मध्ये ३६ पैकी १० आणि २०१७ साली ४८ पैकी केवळ १३ गुन्हे उघडकीस आणण्यात पोलीस यशस्वी झाले होते. मागील वर्षभरापासून सायबर पोलिसांच्या कामगिरीचा आलेख अधीक्षक आरती सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली उंचावलेल्या आकडेवाडीवरून दिसून येतो.

Web Title: 2 lakh banana recovered from online fraud

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.