शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

वणी-सापुतारा रस्त्यावर २ कोटीची तंबाखु जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2021 18:52 IST

वणी : राजस्थान येथुन बेंगलोरला कटेनरमधुन वाहतुक केली जाणारी दोन कोटी दहा लाख रुपयांचा मिराज कंपनीची तंबाखु वणी सापुतारा ...

ठळक मुद्देवणी पोलिसांची मोठी कारवाई ; तस्कारांचे दणाणले धाबे

वणी : राजस्थान येथुन बेंगलोरला कटेनरमधुन वाहतुक केली जाणारी दोन कोटी दहा लाख रुपयांचा मिराज कंपनीची तंबाखु वणी सापुतारा रस्त्यावरील करंजखेड फाट्यावर पकडण्यात आली असुन वणी पोलीसांच्या मोठ्या कारवाईमुळे तस्करांचे धाबे दणाणलेआहे. परराज्यातुन विशेषतः राजस्थान राज्यातुन गुजरातमार्गे महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेल्या वस्तुची तस्करी होत असल्याची माहीती सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्नील राजपुत यांना मिळाली. सदर माहीतीची खातरजमा करण्यासाठी गोपनीय पद्धतीने माहीती संकलीत केली.त्यात तथ्यांश आढळल्याने पोलीस अधिक्षक सचिन पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार तस्करीचा मार्ग शोधताना महत्वाचे धागेदोरे मिळताच वणी सापुतारा रस्त्यावर शनिवारी रात्री उशिरा सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्नील राजपुत व पोलीस पथक करंजखेड फाट्यावर सापळा लावला असता आर जे ३० जीए ३८२४ व आर जे ३० जीए ३९१४ या क्रमांकाचे दोन कंटेनर सापुतारा मार्गे संशयास्पद मार्गक्रमण करत असल्याची बाब निदर्शनास आली.सदरचे दोन्ही कंटेनर पोलीसांनी अडविले व त्यांची तपासणी केली असता त्यात महाराष्ट्रात प्रतिबंधीत असलेला मिराज कंपनीची तंबाखु बॉक्समधे पॅकींग स्वरुपात असल्याची बाब तपासात पुढे आली. सदरची दोन्ही वाहने पोलीस ठाण्यात आणण्यात आली. रविवारी (दि.१७) सकाळी या दोन्ही वाहनामधुन गृहरक्षक दलाचे जवान व पोलीस कर्मचारी यांनी खोक्यांची वाहतुक करुन वाहनामधुन हा माल उतरवला. त्यानंतर तपासणी करुन मोजदाद केली तसेच अन्न व औषध प्रशासन विभागाला याची माहीती देण्यात आली. उशिरापर्यंत चौकशी सुरु होती.सदर मालाच्या तपासणी अहवालानंतर पुढील कार्यवाही करण्यात येणार असल्याची माहीती देण्यात आली. सुमारे दोन कोटी दहा लाख असे मुल्यांकन सदर तंबाखुचे असल्याची माहीती देण्यात आली.  (१७ वणी)

टॅग्स :Police Stationपोलीस ठाणेCrime Newsगुन्हेगारी