शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

मनपात ८० कोटींचा टीडीआर घोटाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2019 02:09 IST

टीडीआरच्या बाबतीत वादग्रस्त व्यवहार ठरलेल्या नाशिक महापालिकेत आता सुमारे ८० कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. देवळाली येथील एका भूखंडापोटी महापालिकेने २६ कोटी रुपयांचे टीडीआर देण्याची गरज असताना प्रत्यक्षात संगनमताने १०२ कोटी रुपयांचा टीडीआर देण्यात आला असल्याचा आरोप उच्च न्यायालयात दाखल याचिकेत करण्यात आला आहे. यासंदर्भात, याचिकाकर्ता शिवसेनेचे माजी नगरसेवक अ‍ॅड. शिवाजी सहाणे तसेच मनसेचे माजी स्थायी समिती सभापती सलीम शेख यांनी मंगळवारी (दि. १३) पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

ठळक मुद्देउच्च न्यायालयात याचिका दाखल : सुरेश धस यांच्यावरही संशय

नाशिक : टीडीआरच्या बाबतीत वादग्रस्त व्यवहार ठरलेल्या नाशिक महापालिकेत आता सुमारे ८० कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. देवळाली येथील एका भूखंडापोटी महापालिकेने २६ कोटी रुपयांचे टीडीआर देण्याची गरज असताना प्रत्यक्षात संगनमताने १०२ कोटी रुपयांचा टीडीआर देण्यात आला असल्याचा आरोप उच्च न्यायालयात दाखल याचिकेत करण्यात आला आहे. यासंदर्भात, याचिकाकर्ता शिवसेनेचे माजी नगरसेवक अ‍ॅड. शिवाजी सहाणे तसेच मनसेचे माजी स्थायी समिती सभापती सलीम शेख यांनी मंगळवारी (दि. १३) पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.विशेष म्हणजे या याचिकेत महापालिकेच्या आणि राज्य शासनाच्या अन्य अनेक अधिकारी तसेच जागा मालक त्यांचे मुखत्यारपत्र घेणारे विकासक यांना प्रतिवादी करण्यात आले आहे. तथापि, या भूखंडासाठी नजराणा भरण्याची रक्कम कमी करण्याचा निर्णय घेणारे तत्कालीन महसूल राज्यमंत्री सुरेश धस यांच्यावरही संशय व्यक्त करण्यात आल्याने या विषयाला वेगळेच गांभीर्य व्यक्त करण्यात आले आहे.

महापालिकेच्या विकास आराखड्यात यासंदर्भात आरक्षण नमूद करण्यात आले आहे. त्यातील सर्व्हे नंबर २९५/१/अ (सिटी सर्व्हे ६७४९) यातील २ हेक्टर ४३ आर शाळा व मैदानासह आणि अन्य आरक्षणे आहेत. हे क्षेत्र महापालिकेने ताब्यात घेण्यासाठी भूसंपादन प्रक्रिया राबविली होती. मात्र, ही जागा मोफत देऊ त्या बदल्यात नजराण्याची रक्कम कमी करा, असे सांगून संबंधित विकासकांनी प्रयत्न केले. त्यानंतर भूसंपादन प्रक्रिया रद्द करून टीडीआरची मागणी संबंधित जागा मालक आणि विकासकांनी केली. रोख रकमेपेक्षा टीडीआर देण्यास महापालिकेचे प्राधान्य असते त्यामुळे प्रशासनाने याबाबत पुढाकार घेतला. परंतु नंतर मात्र या जमिनीसाठी राज्य सरकारच्या बाजारमूल्यानुसार मूल्यांकन करून जो टीडीआर देणे अपेक्षित होते. त्यापैकी रस्ता सन्मुख सर्व्हे नंबरचे जे दर होते, त्या दराने मूल्यांकन करण्यात आले. या प्रकरणात संबंधित जागा मालक आणि विकासकांना २६ कोटी ६६ लाख ८२ हजारांचा टीडीआर देण्याची गरज असताना प्रत्यक्षात मात्र १०२ कोटी ९८ लाख रुपये किमतीच्या मूल्यांकनाचा टीडीआर देण्यात आला म्हणजेच तब्बल ७६ कोटी ३१ लाख रुपयांचा घोटाळा झाला आहे, असा आरोप अ‍ॅड. शिवाजी सहाणे व सलीम शेख यांनी मंगळवारी (दि.१३) नाशिकमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाCourtन्यायालय