शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशात रस्त्यांना छावणीचं स्वरूप, मोहम्मद युनूस यांच्या घराबाहेर मोठा फौज फाटा; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
2
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
3
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
4
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
5
लोक प्रवाशांच्या जीवावर कोण उठले? सँडहर्स्ट रोड अपघाताची चौकशी जीआरपीकडे
6
ट्रॉलरसह आठ मच्छीमारांचे पाकिस्तानकडून अपहरण?
7
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
8
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
9
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
10
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
11
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
12
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
13
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
14
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
15
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
16
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
17
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
18
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
19
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
20
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी

जिल्ह्यातील रस्त्यांसाठी १५८३ कोटी मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2020 22:01 IST

नाशिक : नुकत्याच जाहीर झालेल्या राज्याच्या अर्थसंकल्पात सुधारणांवर भर देण्यात आल्यामुळे नाशिक जिल्ह्यातील रस्त्यांच्या सुधारणांसाठी १५८३.८७ कोटींचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे. थेट तरतूदच करण्यात आल्याने जिल्ह्यातील १३७ रस्त्यांची दुरुस्ती होणार आहे.

ठळक मुद्देअर्थसंकल्पात तरतूद : १३७ रस्त्यांची होणार सुधारणा; दुर्लक्षित गावांचे उजळणार भाग्य

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : नुकत्याच जाहीर झालेल्या राज्याच्या अर्थसंकल्पात सुधारणांवर भर देण्यात आल्यामुळे नाशिक जिल्ह्यातील रस्त्यांच्या सुधारणांसाठी १५८३.८७ कोटींचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे. थेट तरतूदच करण्यात आल्याने जिल्ह्यातील १३७ रस्त्यांची दुरुस्ती होणार आहे.जिल्ह्यातील नियोजनसंदर्भात झालेल्या बैठकीत जिल्ह्यातील समस्या पुढे आल्याने आणि रेंगाळलेल्या प्रकल्पाकडे दुर्लक्ष झाल्याच्या तक्रारी समोर आल्या होत्या. पालकमंत्री छगन भुजबळ यांनी त्याकडे लक्ष घातले होते. त्यानुसार पर्यटन विकासाला निधी मंजूर झालेला आहे. आता रस्ते विकासासाठी निधी मंजूर झाल्यामुळे जिल्ह्यातील अनेक रस्त्यांचे भाग्य उजळणार आहे.विशेषत: गत सरकारच्याकाळात रस्त्यांच्या कामांकडे दुर्लक्ष करण्यात आल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात करण्यात आल्या होत्या. त्यामुळे पालकमंत्र्यांनी गत सरकारच्या काळात दुर्लक्ष केलेल्या विकासकामांना गती देण्याचे जाहीर केले होते.राज्याच्या अर्थसंकल्पात येवला मतदारसंघातील १८ रस्त्यांसाठी ४७ कोटी रुपये मंजूर झालेले आहेत.या निधीतून येवला मतदारसंघातील अनेक प्रलंबित रस्त्यांच्याकामाला चालना मिळणार आहे. जिल्ह्यातील रस्त्यासंदर्भातील आलेल्या तक्रारींची दखल घेऊन राज्य महामार्गावरील गावांलगतच्या रस्त्यांना प्राधान्य दिले जाणार आहे. यात्रा तसेच पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या गावांच्या रस्त्यांनादेखील या निधीतून प्राधान्य दिले जाणार आहे.रस्त्यांच्या दुरवस्थेसंदर्भात नियोजन बैठकीत लोकप्रतिनिधींनी या गोष्टीकडे लक्ष वेधले होते. त्यावेळी रस्त्याच्या दुरुस्तीची जोरदार मागणी यावेळी करण्यात आली होती.यामध्ये येवला मतदारसंघातील अनकाई-न्यायगव्हाण-पिंपळखुटे-पहाळसाठे-राजापूर प्रजिमा-७० या रस्त्याची सुधारणा करण्यासाठी १८० लाख, प्रमुख राज्यमार्ग २ ते नैताळे ते राज्यमार्ग २७ लाख, दिंडोरी तास-खानगावथडी-तारूखेडले-तामसवाडी खेडलेझुंगे - कोळगाव - रुई - धानोरे - डोंगरगाव - विंचूर - विठ्ठलवाडी - कोटमगाव राज्यमार्ग २७ ला मिळणाऱ्या रस्त्याची सुधारणा करण्यासाठी ४ कोटी ५० लाख, पाटोदा - सावरगाव - नगरसूल -वाईबोथी - भारम प्रजिमा - ६८ रस्त्याची सुधारणा करण्यासाठी २ कोटी, रामा - १० ते तांदूळवाडी -गुजरखेडा-विखरणी-कातरणी प्रजिमा १५८ रस्त्यांची सुधारणा करण्यासाठी ५ कोटी ५ लाख, सावरगाव-धुळगाव-एरंडगाव-भिंगारे-महालखेडा-चोरवड-दत्तवाडी - शिरवाडे प्रजिमा ७२ रस्त्याची सुधारणा करण्यासाठी २ कोटी ४० लाख, तिसगाव-बहादूरी वडनेरभैरव-वडाळीभोई रामा २५ किमी रस्त्याची सुधारणा करण्यासाठी २ कोटी ५० लाख, प्र.जि.मा. ७९ येवला गणेशपूर (सुकी) हडप सावरगांव-जायदरे प्र.जि.मा. ७० रस्ता प्रजिमा १६२ रस्त्यांची सुधारणा करण्यासाठी २ कोटी ५० लाख, येवला पारेगाव- निमगावमढ- महालखेडा -भिंगारे -पुरणगाव ते प्ररामा-रस्त्याची सुधारणा करण्यासाठी ५ कोटी ४९ लाख निधीस मंजुरी मिळाली आहे. लासलगाव-विंचूर रस्ता रामा क्र. ७ किमी. रस्त्याची सुधारणा करण्यासाठी ६ कोटी अशा एकूण १८ रस्त्याच्या सुधारणेसाठी एकूण सुमारे ४७ कोटी रुपयांच्या निधीस अर्थसंकल्पातून मंजुरी मिळाली आहे.पहिल्या टप्प्यातील निधीजिल्ह्यातील रस्त्यांच्या कामासाठी राज्याच्या अर्थसंकल्पात सुमारे दीड हजार कोटींपेक्षा अधिक निधी मंजूर करण्यात आला असला तरी हा निधी पहिल्या टप्प्यातील आहे. दुसºया टप्प्यात मिळणाºया निधीतून प्राधान्य क्रमावर जिल्ह्यातील बहुतांश रस्त्यांची कामे हाती घेतली जाणार आहेत.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाGovernmentसरकार