शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

सिन्नरला विज्ञान प्रदर्शनात १९६ विद्यार्थ्यांचा सहभाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2020 18:30 IST

सिन्नर येथील सिन्नर महाविद्यालयाच्या सुवर्णमहोत्सव व वार्षिक स्नेहसंमेलनाचे विशेष आकर्षण ठरलेले विज्ञान प्रदर्शन-२०२० चे आयोजन विज्ञान शाखेमार्फत करण्यात आले होते. या प्रदर्शनात १९६ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.

सिन्नर : येथील सिन्नर महाविद्यालयाच्या सुवर्णमहोत्सव व वार्षिक स्नेहसंमेलनाचे विशेष आकर्षण ठरलेले विज्ञान प्रदर्शन-२०२० चे आयोजन विज्ञान शाखेमार्फत करण्यात आले होते. या प्रदर्शनात १९६ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.सदर उपक्रमाचे प्रायोजक रसायनशास्त्र विभागातील सामंजस्य करार असलेले आॅलिंपस लॅबोरेटरिज प्रायव्हेट लिमिटेड, डोंबिवली, ठाणे होते. कार्यक्रमाचे उद्घाटन प्राचार्य डॉ. दिलीप शिंदे यांच्या हस्ते झाले. या उद्घाटनप्रसंगी प्राचार्य शिंदे यांनी सहभागी विद्यार्थ्यांच्या प्रयोगाची पाहणी करून विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी शिंदे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत त्यांचा उत्साह वाढवला. विद्यार्थ्यांनीसुद्धा आपले प्रयोग उत्कृष्टपणे सादर केले. सदर उपक्रमास विज्ञान, वाणिज्य व कला शाखेतील एकूण ९५ प्रयोग सादर करण्यात आले होते. यात १९६ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. विज्ञान शाखेचे उपप्राचार्य डॉ. डी. एम. जाधव, डॉ. एम. के. झटे, डॉ. पी. जे. तांबडे, प्रा. एस. टी. पेखळे, प्रा. के. एच. हुगाडे यांनी प्रयोगांचे अवलोकन केले.सिन्नर महाविद्यालयाच्या सुवर्णमहोत्सवाच्या समारोप समारंभाचे अध्यक्ष मविप्र संस्थेच्या सरचिटणीस नीलिमा पवार, मविप्र संस्थेचे चिटणीस डॉ. सुनील ढिकले, सिन्नर तालुका संचालक हेमंत नाना वाजे आदी मान्यवरांनी विज्ञान प्रदर्शनातील प्रयोगांची पाहणी करून विद्यार्थ्यांशी संवाद साधला. श्रीमती पवार यांनी विद्यार्थ्यांचे सादरीकरण ऐकत त्यांच्याशी सदर विषयांवर चर्चा केली व त्यांचे कौतुक केले. यावेळी मान्यवरांनी या विज्ञान प्रदर्शनाची तुलना पुणे विद्यापीठ अंतर्गत घेतल्या जाणाऱ्या आविष्कार उपक्रमासोबत करून कार्यक्रमाचे महत्त्व विशद केले.विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन डॉ. एम. के. झटे, डॉ. पी. जे. तांबडे व प्रा. एच. ए. भदाणे यांनी केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दिलीप शिंदे, उपप्राचार्य आर. व्ही. पवार, डॉ. डी. एम. जाधव व आॅलिंपस लॅबोरेटरी प्रायव्हेट लिमिटेड, डोंबिवली, ठाणे यांचे संचालक आतिश रोडगे यांचे मार्गदर्शन लाभले.

टॅग्स :Nashikनाशिकcollegeमहाविद्यालयEducationशिक्षण