सिन्नर : जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन करून रास्ता रोको करणे, रस्त्यावर टायर जाळणे आदिंसह विविध गुन्ह्यात तालुक्यातील कोनांबे व सोनांबे येथील १९ जणांना अटक करण्यात आली. गुरुवारी या सर्वांची जामिनावर सुटका झाली. बुधवारी सायंकाळी सिन्नर-घोटी मार्गावर कोनांबे फाट्यावर आंदोलन करण्यात आले होते. याप्रकरणी पोलिसांनी २० जणांविरोधात गुन्हा दाखल करून रात्री धरपकड सत्र राबविण्यात आले होते. यात १९ जणांना अटक करण्यात आली होती. या सर्वांना गुरुवारी सिन्नर न्यायालयात हजर केल्यानंतर त्यांची जामिनावर सुटका झाली. (वार्ताहर)
कोनांबे व सोनांबे येथील १९ जणांना अटक, सुटका
By admin | Updated: October 15, 2016 01:46 IST