शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

१९ मुस्लीम उमेदवारांनी अजमावले नशीब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2019 00:47 IST

धुळे लोेकसभा मतदार-संघातील मालेगाव मध्य विधानसभा मतदारसंघात मुस्लीम मतांचे प्राबल्य असल्याने या मतदारसंघात प्रत्येक लोकसभा निवडणुकीच्या वेळी मतविभागणीसाठी मुस्लीम  उमेदवार देण्यात आले तर काही पक्षांनी आपापले उमेदवार उभे करून चाचपणी केल्याचा इतिहास आहे.

मालेगाव : धुळे लोेकसभा मतदार-संघातील मालेगाव मध्य विधानसभा मतदारसंघात मुस्लीम मतांचे प्राबल्य असल्याने या मतदारसंघात प्रत्येक लोकसभा निवडणुकीच्या वेळी मतविभागणीसाठी मुस्लीम  उमेदवार देण्यात आले तर काही पक्षांनी आपापले उमेदवार उभे करून चाचपणी केल्याचा इतिहास आहे.धुळे लोकसभा मतदारसंघात २००९पासून मालेगाव मध्य आणि बाह्य असे दोन विधानसभा मतदारसंघ जोडण्यात आले. त्यानंतर मालेगावच्या एकगठ्ठा मुस्लीम मतांवर सर्वच राजकीय पक्षांचा डोळा राहिला आहे. प्रत्येक लोकसभा निवडणुकीत मुस्लीम मतदारांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. सर्वच उमेदवारांनी त्यासाठी मुस्लीम मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न केला आहे. असे असूनही आतापर्यंत धुळे लोकसभा मतदारसंघात एकही मुस्लीम उमेदवार निवडून आलेला नाही. केवळ मुस्लीम मतांच्या भरवशावर धुळे लोकसभा मतदारसंघात आतापर्यंत विविध पक्षांतर्फे १९ मुस्लीम उमेदवारांनी आपले उमेदवारी दाखल केले. त्यात कुणाला पाडण्याचे तर कुणाला मदत करण्याचे काम केले आहे. सर्वात आधी १९९१ मध्ये ज्यावेळी मालेगाव बाह्य आणि मध्य विधानसभा मतदारसंघ धुळे लोकसभा मतदार-संघाला जोडलेले नव्हते त्यावेळी नाशिक जिल्ह्यातून केवळ बागलाण आणि कळवण तालुका जोडलेला होता.२०१४मध्ये आम आदमी पक्षातर्फे अन्सारी निहाल अहमद मोहंमद हारुण, समाजवादी पक्षातर्फे निहाल अहमद अब्दुल रहेमान दानेवाला, अ.वि. पार्टीतर्फे महेमूद भाईजान, वेल्फेअर पार्टी आॅफ इंडियातर्फे शेख मुख्तार अहमद मोहंमद कासीम, अपक्ष म्हणून अब्दुल हमीद शेख हबीब, मो. इस्माईल जुम्मन, गाझी ऐतजाद मुबीनखान, जाफर बापूजी पठाण, पिंजारी जैनुद्दीन हुसेन, सय्यद मोहंमद कय्युम, सय्यद सलीम सय्यद अलीम यांनी उमेदवारी केली होती.२००९मध्ये जनता दलातर्फे निहाल अहमद मौलवी मोहंमद उस्मान, बसपातर्फे रिजवान मो. अकबर अपक्ष गाझी अजहर अहमद मुबीन अहमद खान, भारतीय अल्प सुरक्षा महासंघातर्फे अन्सारी मोहंमद इस्माईल मोहंमद इब्राहीम, आणि नवभारत निर्माण पक्षातर्फे अरीफ अहमद शेख जाफर यांनी उमेदवारी केली होती.२००९ मध्ये धुळे लोकसभा मतदारसंघाची पुनर्रचना करण्यात येऊन मालेगाव मध्य आणि मालेगाव बाह्य विधानसभा मतदारसंघ धुळे लोकसभा मतदारसंघाला जोडण्यात आले. मालेगाव मध्य मतदारसंघात २००९ मध्ये दोन लाख २६ हजार ३१ इतके मुस्लीम मतदार होते. लोकसभा मतदारसंघाची पुनर्रचना करण्यात आल्यानंतर प्रथमच विविध पक्षांतर्फे सहा मुस्लीम उमेदवार मैदानात उतरविण्यात आले. २०१४च्या लोकसभा निवडणुकीत सर्वात जास्त म्हणजे ११ मुस्लीम उमेदवार विविध पक्षांतर्फे मैदानात उतरविण्यात आले.१९९१मध्ये अहमद खान मोहंमद खान मरदान हे एकमेव मुस्लीम उमेदवार अपक्ष उभे होते. त्यावेळी त्यांना ६९९ इतकी मते पडली होती. त्यावेळी मालेगाव मध्य किंवा मालेगाव बाह्य हे विधानसभा मतदारसंघ जोडण्यात आलेले नव्हते. त्यावेळी कॉँग्रेसचे बापू हरी चौरे हे खासदार म्हणून निवडून आले होते.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकdhule-pcधुळे