नाशिक : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा केंद्रीय क्र ीडा महोत्सव १८ ते १९ नोव्हेंबर रोजी के.टी.एच.एम. महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित करण्यात आला आहे. मंगळवारी (दि. १८) रोजी सकाळी १० वा. विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. माणिकराव साळुंखे यांच्या शुभ हस्ते क्र ीडा महोत्सवाचे उद््घाटन होणार आहे. मुक्त विद्यापीठात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या खिलाडूवृत्तीला प्रोत्साहन देण्यासाठी गेल्या दहा वर्षांपासून क्र ीडा महोत्सवाचे आयोजन केले जात आहे. विद्यापीठाच्या अमरावती, औरंगाबाद, नाशिक, मुंबई, पुणे, नागपूर, नांदेड, कोल्हापूर, कल्याण आणि सोलापूर या दहा विभागीय केंद्रांवर पहिली फेरी घेण्यात आली. या फेरीत प्रथम क्र मांकाने यशस्वी झालेले सुमारे ३५० खेळाडू नाशिकच्या केंद्रीय क्र ीडा महोत्सवात सहभागी होणार आहेत. या स्पर्धेतून २७ नोव्हेंबर ते १ डिसेंबर कालावधीत औरंगाबाद येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात होणाऱ्या अश्वमेध क्र ीडा स्पर्धेसाठी विद्यापीठाच्या संघाची निवड करण्यात येणार आहे. या क्र ीडा महोत्सवात खो-खो, कबड्डी, हॉलीबॉल, बास्केटबॉल या सांघिक खेळांबरोबरच अॅथलेटिक्सच्या सर्व प्रकारांत विद्यापीठाचे विद्यार्थी भाग घेणार आहेत. कुलसचिव डॉ. प्रकाश अतकरे, विद्यार्थी कल्याण विभागाचे प्रमुख श्याम पाडेकर, केटीएचएम महाविद्यालयाचे क्र ीडा विभाग प्रमुख प्रा. बाजीराव पेखळे, अमोल पाटील व महोत्सवासाठी स्थापन करण्यात आलेल्या विविध समित्यांचे सदस्य यांच्या मार्गदर्शनाखाली क्र ीडा महोत्सव संपन्न होणार आहे़
मुक्त विद्यापीठाचा केंद्रीय क्र ीडा महोत्सव १८ ्रपासून
By admin | Updated: November 16, 2014 01:03 IST