शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

3 विषयांत नापास झाल्यानं 18 वर्षांच्या विद्यार्थिनीची आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2018 13:12 IST

शहरातील सिडको परिसरात एक दुर्दैवी घटना घडली आहे. एका 18 वर्षांच्या विद्यार्थिनीनं तीन विषयांत नापास झाल्यानं गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.

नाशिक- शहरातील सिडको परिसरात एक दुर्दैवी घटना घडली आहे. एका 18 वर्षांच्या विद्यार्थिनीनं तीन विषयांत नापास झाल्यानं गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या घटनेनंतर परिसरात शोककळा पसरली आहे. मयुरी सोनावणे असं या विद्यार्थिनीचं नाव आहे. नापास झाल्याच्या नैराश्यातून तिने आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे. अंबड पोलिसांनी या प्रकरणात आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून, पुढील तपास सुरू आहे. 

मयुरी नाशिकमधील मराठा कॉलेजमध्ये एफवायबीएचे प्रथम वर्षात शिक्षणाचे धडे गिरवत होती. तीन विषयांत नापास झाल्यानं ती काहीशी निराश होती. आपल्या बरोबरच्या मैत्रिणी पास होऊन पुढच्या वर्गात जात असल्यानं ती नैराश्येच्या गर्तेत सापडली होती. त्यामुळेच तिनं आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे.आपण मागे राहिल्याचे शल्य मयुरीच्या मनात होते. यामुळे आलेल्या नैराश्यातून मंगळवारी (दि. 3) रात्री साडेदहा वाजता घरातील बेडरूममधील पंख्याला साडीच्या सहाय्याने मयुरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही बाब लक्षात येताच तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मृत घोषित केले. दरम्यान, या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

टॅग्स :NashikनाशिकSuicideआत्महत्या