शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

१६७ रेशन दुकानांचे काढणार जाहीरनामे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2018 00:56 IST

जिल्ह्यातील बंद झालेल्या ३६३ रेशन दुकानांपैकी १६७ दुकानांसाठी नव्याने जाहीरनामा काढण्याची तयारी जिल्हा पुरवठा कार्यालयाने सुरू केली

नाशिक : जिल्ह्यातील बंद झालेल्या ३६३ रेशन दुकानांपैकी १६७ दुकानांसाठी नव्याने जाहीरनामा काढण्याची तयारी जिल्हा पुरवठा कार्यालयाने सुरू केली असून, डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात या संदर्भातील प्रक्रिया पूर्ण होऊन नवीन दुकाने सुरू होण्याची शक्यता आहे. यापूर्वी बचतगटांना सक्षम करण्यासाठी रेशन दुकाने देण्याच्या शासनाच्या निर्णयात बदल करून आता ग्रामपंचायतींना प्राधान्य देण्याचे ठरविण्यात आल्याने ग्रामपंचायतींना उत्पन्नाचा नवीन मार्ग मिळाला आहे.पुरवठा विभागाकडून वेळोवेळी केल्या जाणाºया रेशन दुकान तपासणीत आढळणाºया गंभीर दोषामुळे काही दुकाने रद्द करण्याची कार्यवाही करण्यात आली आहे. तर अलीकडच्या काळात सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गत करण्यात आलेल्या बदलांमुळे रेशन दुकान चालविण्यात ‘रस’ राहिला नसलेल्या दुकानदारांनी थेट दुकानाचा राजीनामाच सादर केला आहे. त्यामुळे जिल्ह्यात जवळपास ३६३ दुकाने रिक्त असून,  त्यांचा भार लगतच्या रेशन दुकानांवर सोपविण्यात आला आहे. मध्यंतरी शासनाने रेशन दुकानांचे जाहीरनामे काढण्यास स्थगिती दिली होती, ती आता उठविण्यात आल्याने जिल्हा पुरवठा विभागाने पहिल्या टप्प्यात १६७ नवीन दुकाने सुरू करण्यासाठी तयारी सुरू केली आहे. त्यासाठी प्रत्येक तालुक्यातील रिक्त दुकानांची माहिती मागवून अत्यावश्यक दुकाने सुरू करण्याचे ठरविले आहे. पूर्वी गावोगावच्या महिला बचतगटांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी शासनाने रेशन दुकाने बचतगटांना देण्याची भूमिका घेतली होती. परंतु या बचतगटांच्या आड काही रेशन दुकानदारांनीच पुन्हा दुकानांचा ताबा घेतला तर काही गावात बचतगटांमध्ये स्पर्धा होऊन त्यात राजकारणाने शिरकाव केला होता. महिला बचतगटाला रेशन दुकान देण्यासाठी ग्रामसभेचा ठराव आवश्यक करण्यात आला होता. परंतु गावकीच्या राजकारणामुळे अनेक बचतगटांना ना हरकत देण्यास ग्रामपंचायतींनी नकार दिल्यामुळे दुकानांचे परवाने मिळूनही ते कागदावरच राहिले होते. या सर्व अनुभवाचा विचार करता, शासनाने आता मात्र ग्रामपंचायतींना प्राधान्य देण्याचे ठरविले असून, ग्रामपंचायतीचा कारभार गावातील सदस्यांकडून पाहिला जात असल्याने रेशन दुकानात पारदर्शी कारभार होऊन गैरप्रकाराला आळा बसेल, असा त्यामागे अंदाज बांधला जात आहे.यादी होणार तयारजिल्हा पुरवठा विभागाने या संदर्भातील तयारी सुरू केली असून, ज्या गावांमध्ये दुकाने सुरू करावयाची आहेत, त्यांची यादी तयार करून त्या त्या गावात जाहीर करण्यात येणार आहे. त्यानंतर त्यांच्याकडून अर्ज मागविण्यात येतील.

टॅग्स :nashik collector officeनाशिक जिल्हाधिकारी कार्यालयNashikनाशिक