शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

गत साडेपाच वर्षांत १६५२ बेवारस मृतदेह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2018 00:42 IST

तीर्थक्षेत्र नाशिकमध्ये दर बारा वर्षांनी भरणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यात आपल्या वृद्ध आई-वडिलांना बेवारसपणे सोडून जाणारी मुले, बेघर, फिरस्ते व घातपात अशा विविध कारणांनी गत पाच वर्षे व सहा महिन्यांच्या कालावधीत नाशिकमध्ये तब्बल एक हजार ६५२ बेवारस मृतदेह शहरातील विविध भागामध्ये सापडले आहेत़

नाशिक : तीर्थक्षेत्र नाशिकमध्ये दर बारा वर्षांनी भरणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यात आपल्या वृद्ध आई-वडिलांना बेवारसपणे सोडून जाणारी मुले, बेघर, फिरस्ते व घातपात अशा विविध कारणांनी गत पाच वर्षे व सहा महिन्यांच्या कालावधीत नाशिकमध्ये तब्बल एक हजार ६५२ बेवारस मृतदेह शहरातील विविध भागामध्ये सापडले आहेत़ यातील सर्वाधिक मृतदेहांची संख्या ही पंचवटी व गोदाकाठ परिसरातील आहेत़ विशेष म्हणजे बेवारस म्हणून सापडलेल्या अवघ्या तिघांच्याच नातेवाइकांचा शोध लागला आहे़  जिल्हा शासकीय रुग्णालयातील शवागारात २०१३ ते जुलै २०१८ या कालावधीत १ हजार ६५२ बेवारस मृतदेहांना नातलगांची प्रतीक्षा होती़ मात्र, अखेरपर्यंत कोणीही नातलग न आल्याने व ओळख न पटल्याने नाशिक महापालिकेने या मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले आहेत़ शहरातील गंगाघाटावर दोन वेळच्या जेवणाची तसेच निवाºयाची मोफत सोय होत असल्याने या ठिकाणी भिक्षेकरी, बेघर व फिरस्ते यांची संख्या मोठी आहे़ या ठिकाणी वास्तव्य करणाºयांना ओळख लपवायचीच असते तसेच त्यांच्याकडे फारसे कुणी लक्षही देत नाही़बेवारस सापडलेल्या मृतदेहांमध्ये वृद्धांची तसेच आजारपणामुळे मृत्यू झालेल्याची संख्या अधिक आहे़ जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झालेल्यांनी अखेरपर्यंत आपण कोण आहोत, कुठून आलो आहे, आपले नातेवाईक कोण याची माहिती दिलेली नाही़ त्यामुळे शहरातील बेघर, फिरस्ते, भिक्षेकरी यांची माहिती घेण्याची आवश्यकता आहे़बेवारस मृतदेहाचा सात दिवस सांभाळबेवारस मृतदेह सापडल्यानंतर तो जिल्हा शासकीय रुग्णालयातील शवागारात सात दिवसांपर्यंत ठेवला जातो़ पोलिसांचा अहवाल आल्यानंतर या मृतदेहावर नाशिक महापालिका प्रशासनातर्फे अंत्यविधी केला जातो़ यापूर्वी सापडलेल्या बेवारस मृतदेहाचे छायाचित्र, सापडलेल्या वस्तू, अंगावरील ओळखीच्या खुणा यांचे फोटो काढले जातात़ त्यामुळे भविष्यात एखाद्या व्यक्तीने सांगितलेले वर्णन मृतदेहाशी जुळल्यास ओळख पटविणे शक्य होते़दोन  मृतदेह संशयास्पदबेघर तसेच घातपातातील बेवारस मृतदेहांची ओळख पटविण्याचा पोलिसांकडून प्रयत्न केला जातो़ मात्र, घातपातानंतर ओळख पटविणे शक्य होणार नाही, अशा पद्धतीने मृतदेहाचे विद्रुपीकरण केले जाते़ सिन्नर येथील घाटात एका अनोळखी तरुणीचा मृतदेह फेकण्यात आला होता़ अखेरपर्यंत पोलिसांना या तरुणीचा शोध घेता आला नाही़ तर बेवारस मृतदेहांपैकी आतापर्यंत केवळ तिघांच्याच नातेवाइकांचा शोध लागला असून, त्यांच्या उपस्थितीत या मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात आले़शहरात सापडणारे बेवारस मृतदेह हे जिल्हा रुग्णालयात पाठविले जातात़ यानंतर संबंधित मृतदेह तसेच त्याच्या अंगावरील ओळखीच्या खुणांचे फोटो काढून ओळख पटविण्यासाठी शहरातील माध्यमांकडे प्रकाशित करण्यासाठी दिले जातात़ याबरोबरच नाशिक सिटी पोलिसांच्या संकेतस्थळावरील डेड बॉडीज या ठिकाणी पोलीस ठाणेनिहाय सापडणाºया मृतदेहांची माहिती टाकली जाते़ मे महिन्यात शहरातील विविध ठिकाणचे भिक्षेकरी, लहान मुले, वृद्ध अशा १६४ जणांचे पुनर्वसन करण्यासाठी प्रयत्न केले जात आहे़  - डॉ़ रवींद्र सिंगल, पोलीस आयुक्त, नाशिक

टॅग्स :Deathमृत्यू