जिल्ह्यात  १६२ कोरोनामुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2021 01:30 AM2021-02-08T01:30:02+5:302021-02-08T01:30:58+5:30

जिल्ह्यात रविवारी (दि. ७) १६२ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले असून, १७७ रुग्ण बाधित झाले आहेत. मनपा क्षेत्रात दोन तर ग्रामीणला एक मृत्यू झाल्याने, बळींची संख्या २,०५९ वर पोहोचली आहे.

162 corona free in the district | जिल्ह्यात  १६२ कोरोनामुक्त

जिल्ह्यात  १६२ कोरोनामुक्त

Next

नाशिक : जिल्ह्यात रविवारी (दि. ७) १६२ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले असून, १७७ रुग्ण बाधित झाले आहेत. मनपा क्षेत्रात दोन तर ग्रामीणला एक मृत्यू झाल्याने, बळींची संख्या २,०५९ वर पोहोचली आहे.
नाशिक जिल्ह्यात आतापर्यंत बाधित झालेल्या रुग्णांची संख्या १ लाख १६ हजार ८२८ वर पोहोचली असून, त्यातील १ लाख १३ हजार ५९४ रुग्ण पूर्णपणे बरे होऊन घरी परतले आहेत, तर १,१७५ रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याची सरासरी टक्केवारी ९७.२३ वर पोहोचली आहे. त्यात नाशिक शहरात ९७.९५, नाशिक ग्रामीण ९६.२७, मालेगाव शहरात ९३.१९, तर जिल्हाबाह्य ९४.९१ असे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आहे. जिल्ह्यात आतापर्यंत केलेल्या चाचण्यांची संख्या ५ लाख ७ हजार ९०६ असून, त्यातील ३ लाख ९० हजार ५९७ रुग्ण निगेटिव्ह, तर १ लाख १६ हजार ८२८  रुग्ण बाधित आढळून आले असून, ४४१ रुग्णांचे अहवाल प्रलंबित आहेत.

Web Title: 162 corona free in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.