शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

संचारबंदीत रस्त्यावर फिरणाऱ्या 162 दुचाकी तीन महिन्यांसाठी जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2020 18:57 IST

३४ जॉगर्सला कारवाईचा दणका

नाशिक : शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता प्रशासनाकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. मात्र, नागरिकांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र आहे. पेट्रोल विक्रीवर मर्यादा आणूनदेखील दुचाकींचा वापर सर्रास सुरूच असल्याचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्या लक्षात येताच त्यांनी विनाकारण रस्त्यावर येणाऱ्या वाहनधारकांच्या दुचाकी थेट तीन महिने जप्त करण्याचे आदेश काढले आहेत. या तीन दिवसांत तब्बल 162 दुचाकी शहरातील विविध भागातून जप्त करण्यात आल्या आहेत. सदर दुचाकीमालकांना पुढील तीन महिन्यांकरिता आपल्या दुचाकीला मुकावे लागणार आहे.

‘कोरोना’चा वाढता संसर्ग टाळण्यासाठी संपूर्ण देशभरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. शहरासह जिल्ह्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा, आपत्ती व्यवस्थापन कायद्यासह कलम- १४४ लागू करण्यात आला आहे. त्यानुसार प्रभावी अंमलबजावणी पोलीस करत आहेत.  नागरिकांना मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडण्यास मज्जाव करण्यात आला आहे. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या ३४ जाॅगर्स ला पोलिसांनी कारवाईचा दणका दिला आहे. ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर नागरिकांना आपत्कालीन व अत्यावश्यक कारणाव्यतिरिक्त घराबाहेर न पडण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले होते. मात्र, काही हौशी नागरिकांकडून जिल्हा प्रशासनाच्या आवाहनाकडे दुर्लक्ष करून दिवस उजाडताच ‘मॉर्निंग वॉक’च्या निमित्ताने घराबाहेर पडले होते. हेच नागरिक आता पोलिसांच्या रडारवर आले आहेत. जॉगर्सविरोधात थेट गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सर्वच पोलीस ठाण्यात सुरू करण्यात आली आहे. 

शहरातील सर्व क्रीडांगणे, उद्याने, जॉगिंग ट्रॅक बंद करण्यात आले आहेत. सार्वजनिक ठिकाणी नागरिकांची गर्दी होणार नाही, यासाठी सर्व खबरदारी प्रशासनाकडून घेतली जात आहे. गेल्या दोन दिवसांत गंगापूर पोलिसांत २९, उपनगर पोलिसांत २ तर देवळाली कॅम्प पोलिसांत ३ असे एकूण ३४ मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडलेल्या नागरिकांवर कारवाईचा बडगा उगारत गुन्हे दाखल केले आहेत.

दरम्यान, ज्या भागात सकाळी नागरिक फेरफटका मारताना दिसतील, त्यांच्याविरुद्ध गुन्हे नोंदविण्यात येत आहेत. तसेच, रात्री जेवणानंतर शतपावली करणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्याचे संकेत पोलिसांनी दिले आहेत. गस्तीवर असलेल्या विशेष पथकांना जॉगिंग ट्रॅकसह शहरातील अंतर्गत रस्त्यांवर लक्ष ठेवण्याच्या सूचना पोलीस प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत.-----६५९ नागरिकांवर कारवाईदेशात सर्वत्र संचारबंदी लागू आहे. संचारबंदी आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांविरोधात पोलिससांकडून कठोर कारवाई करण्यात येत आहे. गेल्या आठवड्याभरात ६५९ नागरिकांविरोधात विविध पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. संचारबंदी असेपर्यंत ही कारवाई सुरूच राहणार असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

‘कोराेना पोलीस मदत कक्ष’ सज्जशहर पोलीस आयुक्तालयामार्फत संचारबंदीत जीवनावश्यक व इतर सेवासंबंधी मार्गदर्शन करण्यासाठी तसेच नागरिकांच्या मदतीसाठी ‘कोरोना पोलीस मदत कक्ष’ कार्यरत आहे. नागरिकांनी अत्यावश्यक सेवेसाठी बाहेर पडताना काेरोना कक्षासोबत संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

टॅग्स :PoliceपोलिसCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस