शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

वीज दरवाढीच्या विरोधात १५ जानेवारीस ‘रास्ता रोको’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2018 00:49 IST

महावितरण कंपनीने औद्योगिक वीजग्राहकांवर लादलेली दरवाढ आणि पॉवर फॅक्टर पेनल्टीमुळे ग्राहकांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. ही दरवाढ मागे घ्यावी म्हणून राज्यभर जनजागृती करण्यात येत असून, पुढील आठवड्यात लोकप्रतिनिधी, वीज कंपनीचे मुख्यअभियंता, जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात येणार आहे.

सातपूर: महावितरण कंपनीने औद्योगिक वीजग्राहकांवर लादलेली दरवाढ आणि पॉवर फॅक्टर पेनल्टीमुळे ग्राहकांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. ही दरवाढ मागे घ्यावी म्हणून राज्यभर जनजागृती करण्यात येत असून, पुढील आठवड्यात लोकप्रतिनिधी, वीज कंपनीचे मुख्यअभियंता, जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात येणार आहे. १५ जानेवारीपर्यंत सकारात्मक निर्णय न झाल्यास राज्यभर रास्ता रोको आंदोलन करून निषेध व्यक्त करण्याचा निर्णय आयमात झालेल्या औद्योगिक संघटनांच्या बैठकीत घेण्यात आला आहे.शुक्र वारी (दि.२८) महाराष्ट्र वीजग्राहक संघटनेचे अध्यक्ष प्रताप होगाडे यांच्या अध्यक्षतेखाली औद्योगिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. यावेळी महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष संतोष मंडलेचा यांनी सांगितले की, महावितरण कंपनीने औद्योगिक वीजग्राहकांवर लादलेली दरवाढ आणि पॉवर फॅक्टर पेनल्टीमुळे ग्राहकांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. याबाबत चेंबरच्या माध्यमातून राज्यात जनजागृती करण्यात येत आहे. दरवाढीच्या विरोधात राज्यात जनआंदोलन उभारण्याचे ठरविण्यात आले आहे. या आंदोलनात सर्व संघटनांनी सहभागी होण्याचे आवाहन केले. अ‍ॅड. सिद्धार्थ सोनी यांनी सांगितले की, वीज नियामक आयोगाने महावितरण कंपनीचा प्रस्ताव जसाचा तसा मान्य केला व तोच प्रस्ताव लागू केला आहे. त्यामुळे औद्योगिक वीज दरात मोठी तफावत आहे. असे सांगून वीजदर वाढीमुळे होणारे परिणाम विषद केले. यावेळी निमाचे सरचिटणीस तुषार चव्हाण, उद्योग आघाडीचे प्रदीप पेशकार, मंगेश पाटणकर, धनंजय बेळे, नाशिक जिल्हा ग्राहक पंचायतीचे विलास देवळे, चेंबरचे मुकुंद माळी, गिरीश मोहिते, अजय बाहेती आदींनी आपले मत मांडले. यावेळी एस. के. नायर, योगीता अहेर, वैशाली देवळे, चंद्रकांत हिप्पळगावकर, मिलिंद देशपांडे, व्यंकटेश मूर्ती आदींसह विविध औद्योगिक संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. सूत्रसंचालन मिलिंद राजपूत यांनी केले. राजेंद्र अहिरे यांनी आभार मानले.दरवाढ अन्यायकारक असल्याने असंतोषवीज नियामक आयोगाने मंजूर केलेली दरवाढ ३ ते ६ टक्के आहे. प्रत्यक्षात मात्र पॉवर फॅक्टर इन्सेंटिव्ह नाही व पेनल्टी लागू केल्याने ८० टक्के औद्योगिक ग्राहकांच्या वीज बिलात २० ते २५ टक्के वाढ झाली आहे. ही दरवाढ अन्यायकारक असल्याने प्रचंड असंतोष पसरला आहे. महाराष्ट्र चेंबरच्या माध्यमातून संपूर्ण राज्यात जनजागृती करून जनआंदोलन छेडण्यात येणार आहे. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात खासदार, आमदार, लोकप्रतिनिधी, वीज कंपनीचे मुख्यअभियंता, जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात येणार आहे. १५ जानेवारीपर्यंत सकारात्मक निर्णय न झाल्यास राज्यभर रास्ता रोको आंदोलन करून निषेध व्यक्त करण्याचा निर्णय महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचे अध्यक्ष प्रताप होगाडे यांनी जाहीर केला.

टॅग्स :electricityवीजnashik collector officeनाशिक जिल्हाधिकारी कार्यालय