शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

नाशकात दरमहा १५० गायींचा टळतो मृत्यू !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2018 01:00 IST

कत्तलीसाठी जनावरे घेऊन जाणारे वाहन पकडून त्यांना गोशाळेत पाठविण्याच्या पोलिसांच्या कामगिरीमुळे नाशिकमध्ये दरमहा किमान १५० गायींचा मृत्यू टळतो. पोलिसांच्या विशेष तपासणीच्या काळात अशाप्रकारचे वाहन आढळून आल्यानंतर सदर गायींना जीवदान मिळते.

नाशिक : कत्तलीसाठी जनावरे घेऊन जाणारे वाहन पकडून त्यांना गोशाळेत पाठविण्याच्या पोलिसांच्या कामगिरीमुळे नाशिकमध्ये दरमहा किमान १५० गायींचा मृत्यू टळतो. पोलिसांच्या विशेष तपासणीच्या काळात अशाप्रकारचे वाहन आढळून आल्यानंतर सदर गायींना जीवदान मिळते. गोवंश वाचविण्यासाठी अशाप्रकारचे विशेष मोहीम राबविल्यास अनेक गायींची सुटका होऊ शकते, असा आशावाद व्यक्त केला जात आहे.  नाशिक जिल्ह्याला लागून असलेल्या इतर राज्यांच्या सीमा आणि अनधिकृत कत्तलखान्यांचा आंतरराज्यीय व्यवसाय यामुळे नाशिकमध्ये अनेकदा कत्तलीसाठी जनावरे आणली जात असल्याचा संशय व्यक्त होतो. नाशिक जिल्ह्याच्या सीमारेषांवर तसेच शहराच्या मध्यवर्ती भागात पहाटेच्या सुमारास अनेकदा कत्तलीसाठी घेऊन जाणाऱ्या जनावरांची पोलिसांनी सुटका केलेली आहे. साधारणपणे महिनाभरात राबविण्यात येणाºया चार-पाच विशेष कारवायांमध्ये किमान १५० ते १७० जनावरांची सुटका केली जाते. पकडलेली जनावरे ही शहरातील तीन ते चार महत्त्वाच्या गोसेवा केंद्रांकडे सुपूर्द केली जातात. एका गोसेवा केंद्राकडे महिनाभरात किमान ३० ते ४० गायी पोलिसांकडून सुपुर्द केल्या जातात. पोलिसांच्या कारवाई आढळून आलेल्या जनावरांची माहिती नोंद केली जाते.  पोलिसांकडून शहरात नाकाबंदी करण्यात आल्यानंतर या मोहिमेत कत्तलीसाठी घेऊन जाणारे वाहन आढळल्यास कारवाई होते. गोवंश हत्या रोखण्यासाठीची विशेष मोहीम राबविण्यास आल्यास मोठ्या प्रमाणात गायींचा जीव वाचू शकतो. अनेकदा खबºयांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारावर कारवाई केली जाते. यामुळेदेखील अनेक गायींना जीवदान मिळते. महाराष्टÑात गोहत्या प्रतिबंधक कायदा लागू असतानाही राज्यभरात अनेक ठिकाणी कत्तलीसाठी जनावरे घेऊन जाताना पकडण्यात येतात. मात्र त्या तुलनेत संबंधितावरील कारवाई उघड होत नसल्याने कायद्याची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याचे बोलले जाते.गोशाळांवर येतो ताणपोलिसांनी पकडलेली जनावरे ही शहरातील काही ठराविक गोशाळांकडे सोपविली जातात. त्यामुळे गोशाळांमध्ये जनावरांची संख्या वाढली जाते. या जनावरांच्या पालनपोषणासाठी शासनपातळीवर कोणतीही व्यवस्था नसल्याने आणि दानशूरदेखील गोधनासाठी गोखाद्य देत नसल्यामुळे गोशाळांपुढे गोपालनाचा मोठा प्रश्न निर्माण होता. त्यामुळे कित्येकदा गोशाळाचालकांना दात्यांचा शोध घ्यावा लागतो किंवा नागरिकांना आवाहन तरी करावे लागते.

टॅग्स :cowगायNashikनाशिक