शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

मालेगावी १४ जणांची भर; १२७ बाधितांवर उपचार सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2020 23:42 IST

रविवारी सायंकाळी पावणेसहा वाजता मिळालेल्या तपासणी अहवालात नव्याने १४ बाधित मिळून आल्याने शहरातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या ७७९वर पोहोचली आहे. शनिवारपर्यंत त्यातील ६०४ जण उपचार घेऊन बरे झाले आहेत. आता मालेगावात उपचार घेत असलेल्या बाधितांची संख्या १२७ इतकी आहे.

ठळक मुद्दे हॉटस्पॉट : बरे झालेल्या ६०४ रूग्णांची घरी रवानगी

मालेगाव : रविवारी सायंकाळी पावणेसहा वाजता मिळालेल्या तपासणी अहवालात नव्याने १४ बाधित मिळून आल्याने शहरातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या ७७९वर पोहोचली आहे. शनिवारपर्यंत त्यातील ६०४ जण उपचार घेऊन बरे झाले आहेत. आता मालेगावात उपचार घेत असलेल्या बाधितांची संख्या १२७ इतकी आहे.मालेगावी कोरोना बाधितांवर उपचार होऊन पूर्ण बरे झालेल्यांची संख्या वाढून उपचार घेणारे केवळ ८४ रुग्ण राहिले होते, मात्र गेल्या दोन ते तीन दिवसात मोठ्या संख्येने बाधित मिळून आल्याने उपचार घेत असलेल्या बाधितांची संख्या १२७ पर्यंत पोहोचली आहे. ग्रामीण भागात कोरोनाने हातपाय पसरल्याने ही संख्या वाढत चालली आहे. आता पावसाळा सुरू होत असल्याने युद्धपातळीवर प्रयत्न करून कोरोनाला रोखावे लागणार आहे.

आज सायंकाळी पावणेसहा वाजेच्या सुमारास १४७ जणांचे तपासणी अहवाल मिळाले. त्यात ९७ निगेटिव्ह, तर १४ पॉझिटिव्ह रुग्ण मिळून आले आहेत. आज मिळालेल्या बाधितांमध्ये कॅम्पातील ३० वर्षीय एसआरपीएफ जवान, गिलानकर नगरातील ४० वर्षीय पुरुष, आयेशानगर भागातील ३० वर्षीय तरुण, संगमेश्वरच्या खारकर वाड्यातील १४ आणि १५ वर्षांची दोन मुले, ४२ वर्षाची महिला, ७० वर्षांचा वृद्धाचा समावेश आहे. द्यानेतील शिवनगर भागातील ४५ वर्षीय पुरुष, नांदगावची ६२ वर्षीय महिला, मालेगावच्या कुरेशबाद मधील ४८ वर्षीय पुरुष, इजहार अश्रफनगरमधील ८ वर्षांचा मुलगा, सर सय्यदनगरमधील ३१ वर्षीय महिला, १४ आणि १० वर्षांची दोन मुले कोरोनाबाधित मिळून आले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्य