शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

१४ महिन्यांच्या बालिकेचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2019 01:56 IST

अवघ्या चौदा महिन्यांच्या चिमुकलीच्या गळ्यावर तीक्ष्ण हत्याराने वार करून खून करण्यात आल्याची घटना आडगाव पोलीस ठाणे हद्दीतील साई पॅराडाइज अपार्टमेंटमध्ये मंगळवारी (दि.१६) घडली. दरम्यान, चिमुकलीच्या आईच्या शरीरावरही काही ठिकाणी जखमा आढळून आल्याचे पोलिसांनी सांगितले.

ठळक मुद्देपोलिसांपुढे उलगडा करण्याचे आव्हानआईच्या शरीरावरही जखमा; खुनाचे गूढ कायम

नाशिक : अवघ्या चौदा महिन्यांच्या चिमुकलीच्या गळ्यावर तीक्ष्ण हत्याराने वार करून खून करण्यात आल्याची घटना आडगाव पोलीस ठाणे हद्दीतील साई पॅराडाइज अपार्टमेंटमध्ये मंगळवारी (दि.१६) घडली. दरम्यान, चिमुकलीच्या आईच्या शरीरावरही काही ठिकाणी जखमा आढळून आल्याचे पोलिसांनी सांगितले. बालिकेच्या खूनप्रकरणाचा उलगडा करताना पोलीसही संशयाच्या भोवऱ्यात अडकले असून, या घटनेप्रकरणी बालिकेच्या वडिलांनी आडगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या घटनेने शहरात हळहळ व्यक्त होत आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, शहरातील औरंगाबाद महामार्गावरील साई पॅराडाइज नावाच्या अपार्टमेंटमधील मुकेश पवार हे कुटुंबीयांसमवेत वास्तव्यास आहे. ते मंगळवारी नेहमीप्रमाणे नोकरीवर गेले असता घरात त्यांची पत्नी योगीता, त्यांचा शाळकरी मुलगा, दीड वर्षांची स्वरा होते. दुपारी २ वाजेच्या सुमारास बालिकेची आई योगीता पवार यांनी जखमी अवस्थेत घरातून बाहेर पडून शेजाऱ्यांना माहिती दिली तसेच भ्रमणध्वनीवरून काही नातेवाइकांनाही कळविले. यावेळी शेजाºयांनी धाव घेतली असता स्वरा जखमी अवस्थेत पलंगावर आढळून आली. यावेळी नातेवाईक व शेजाºयांनी तत्काळ मायलेकीला उपचारार्थ निमाणी येथील एका खासगी रुग्णालयात दाखल केले; मात्र यावेळी डॉक्टरांनी तपासून स्वराला मयत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच स्वराचे वडील मुकेश हेदेखील शहरात पोहचले. दरम्यान, मुलीच्या आईने रात्री उशिरापर्यंत पोलिसांना कुठलीही योग्य माहिती दिलेली नव्हती. त्यांच्यावरही खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बालिकेच्या गळ्यावर, हातावर धारदार शस्त्राच्या जखमा आढळून आल्याचे पोलिसांनी सांगितले. या खुनाचा उलगडा रात्री उशिरापर्यंत झालेला नव्हता; मात्र मुकेश यांच्या फिर्यादीवरून अज्ञात संशयिताविरुद्ध आडगाव पोलीसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रथमदर्शनी ही घटना संशयास्पद असून, घटनास्थळी पोलिसांसह श्वानपथक, वैज्ञानिक न्याय सहायक पथकाने भेट देऊन परिस्थितीजन्य पुरावे गोळा केले आहे.चोरटा चाकू घेऊन घरात शिरला?मुलीची आई योगीता यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार एक अज्ञात इसम तोंडाला रुमाल बांधून घरात चाकू घेऊन चोरीच्या इराद्याने घुसला व त्याने माझ्यासह मुलीवर हल्ला चढविला. झटापट करत असताना मी जखमी झाले व त्याने मुलीवरही वार करून पळ काढल्याची माहिती प्रथमदर्शनी समोर आली आहे.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयMurderखून