शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

१३ सफाई कामगारांच्या नोकरीवर येणार गंडांतर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2018 01:16 IST

स्वच्छतेची कामे परंपरांगत पद्धतीने करणाऱ्या कामगारांच्या वारसांना महापालिकेच्या सेवेत सामावून घेताना मोठा घोळ झाला असून, फक्त मागासवर्गीयांसाठीच सवलत असताना अनुसूचित जमाती व अन्य खुल्या प्रवर्गातील तेरा जणांना सामावून घेतल्याचे आता उघड झाले आहे.

नाशिक : स्वच्छतेची कामे परंपरांगत पद्धतीने करणाऱ्या कामगारांच्या वारसांना महापालिकेच्या सेवेत सामावून घेताना मोठा घोळ झाला असून, फक्त मागासवर्गीयांसाठीच सवलत असताना अनुसूचित जमाती व अन्य खुल्या प्रवर्गातील तेरा जणांना सामावून घेतल्याचे आता उघड झाले आहे. त्यामुळे त्या तेरा जणांच्या सेवेवर आता गंडांतर आले आहे. महापालिकेनेच सदोष निवडप्रक्रिया राबविली असताना त्याचा फटका मात्र या कामगारांना बसणार असल्याने अन्य सफाई कामगार संघटना संतप्त झाल्या आहेत. शासनाने सफाई कामगारांना आणि त्यांच्या वारसांना न्याय देण्यासाठी नियुक्त केलेल्या लाड आणि पागे शिफारसीनुसार महापालिकेत कार्यवाही होत असते. त्यासाठी २०१५ मध्ये अधिकाºयांची एक समिती नियुक्ती केली होती. या समितीने ४२ जणांची भरती केली. तीन वर्षे त्यांच्याकडून फिक्स पे म्हणजेच निश्चित वेतनानुसार सुमारे ३२०० रुपये दरमहा देऊन काम करून घेण्यात आले. नियमानुसार तीन वर्षांनंतर या सफाई कामगारांच्या कामकाजाचा आढावा घेऊन कर्मचाºयांना सेवेत कायम करण्यात येते. त्यानुसार गेल्या ३ नोव्हेंबरला सध्याच्या प्रशासकीय समितीच्या अधिकाºयांच्या समितीची बैठक घेण्यात आली.  अतिरिक्त आयुक्त किशोर बोर्डे समितीचे अध्यक्ष असून त्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या समितीच्या बैठकीत या १३ कामगारांची चुकीच्या पध्दतीने नियुक्ती झाल्याचे आढळल्याने त्यांना नियमित सेवेत घेऊन वेतनश्रेणी लागू करण्यात आलेली नाही. उलट या कामगारांची चुकीच्या पध्दतीने नियुक्ती झाल्याने त्यांना सेवामुक्त करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.औरंगाबादच्या घटनेची धास्तीऔरंगाबाद महापालिकेत अशाच प्रकारे पागे समितीच्या शिफारसीनुसार भरती मोहीम राबवताना मागासवर्गीय नसलेल्यांना सेवेत घेण्यात आले. त्यावेळी शासनाच्या पागे समितीच्या शिफारसींचा अर्थ चुकीचा काढून ही भरती करण्यात आल्याने तेथील अधिकाºयांच्या चौकशा सुरू करण्यात आल्या आहेत. त्यामुळे ३ नोव्हेंबर रोजी नाशिक महापालिकेच्या बैठकीतदेखील शासनाच्या आदेशाच्या अर्थाची चर्चा करण्यात आली आणि त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला असल्याचे प्रशासकीय सूत्रांनी सांगितले.मग यापूर्वीच्या भरतीचे काय?नाशिक महापालिकेत पागे समितीच्या शिफारसींनुसार यापूर्वीही मागासवर्गीयेतरांचीदेखील भरती करण्यात आली आहे, त्याचे काय होणार हा प्रश्न आहे. महापालिकेने भरती केलेल्या या तेराही कामगारांकडून तीन ते साडेतीन वर्षे काम करून घेण्यात आले आहे आणि आता सेवेत कायम करताना त्यांना नियम दाखवला जात असल्याने संबंधितांचे धाबे दणाणले आहे. महापालिकेच्या कृतीला ते न्यायालयात आव्हान देण्याचीदेखील शक्यता आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाEmployeeकर्मचारी