शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

कत्तलीच्या हेतुने आणलेली १३ उंट जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2018 20:34 IST

मालेगाव : गुजरात राज्यातुन मालेगावी कत्तलीच्या हेतुने १३ उंटांची ट्रकमध्ये कोंबुन वाहतूक करणाऱ्या परप्रांतीय तिघा जणांना अपर पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने अटक केली आहे.

मालेगाव : गुजरात राज्यातुन मालेगावी कत्तलीच्या हेतुने १३ उंटांची ट्रकमध्ये कोंबुन वाहतूक करणाऱ्या परप्रांतीय तिघा जणांना अपर पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने अटक केली आहे. या प्रकरणी छावणी पोलीस ठाण्यात चौघा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीसांनी १३ उंट व ट्रक असा सुमारे १३ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. बुधवारी ४ वाजेच्या सुमारास मालेगाव- सटाणारोडवर दाभाडी शिवारातील इंदिरानगर येथे ही कारवाई करण्यात आली. गुजरातकडून मालेगावकडे कत्तलीच्याहेतुने उंट ट्रकमधुन येत असल्याची माहिती अपर पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांच्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक कल्पेशकुमार चव्हाण, देविदास निकम, नितेश खैरनार, दिनेश सरावत, नवनाथ सूर्यवंशी, अभिजित साबळे आदिंनी शहरालगतच्या दाभाडी येथील इंदिरानगर येथे सापळा रचला होता. सटाणा- मालेगाव रस्त्यावरुन येणाºया वाहनांची तपासणी सुरू केली होती. ट्रक (क्र. जी. जे. २४. व्ही. ४९०१) हा ट्रक अडविण्याचा प्रयत्न केला असता ट्रक चालकाने ट्रक पळवून नेला. विशेष पथकाने पाठलाग करुन ट्रक अडविला. या ट्रकमध्ये १३ उंट कोंबुन बांधुन ठेवलेले आढळून आले. पथकाने ट्रकचालक सुरेशजी पारखाजी ठाकुर रा. चंद्रावती, सिद्धपुर गुजरात, दिनेश सोमाभाई सेंडमारवत रा. मैसाणा, गुजरात, असगरजी अख्तरजी भागपत रा. उत्तर प्रदेश या तिघांना अटक केली आहे. तर गुल्लु (पूर्ण नाव माहित नाही) याच्या विरुद्धही छावणी पोलीस ठाण्यात प्राणी संरक्षणक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.-------------अपर पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक कल्पेशकुमार चव्हाण व पथकाने गुजरात राज्यातुन मालेगावकडे कत्तलीच्या हेतुने आणली जाणारे १३ उंट व ट्रक असा सुमारे १३ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. उंट जप्तीचीही पहिलीच कारवाई मानली जात आहे.

टॅग्स :Nashikनाशिक