शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

१२० चालकांनी बजावली आंतरराज्य प्रवासी सेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2020 00:16 IST

नाशिक : परप्रांतीय मजुरांना त्यांच्या राज्यातील सीमारेषेवर नेऊन सोडण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाच्या चालकांनी परराज्यापर्यंत दिलेली सेवा कोणत्याही जोखमीपेक्षा कमी नाही. कोरोनाचा प्रभाव वाढत असल्याच्या काळात नाशिकमधील १२० चालकांनी केवळ मास्क आणि सॅनिटायझर इतक्याच सुरक्षिततेच्या साधनांवर ४७ हजारांपेक्षा अधिक परप्रांतीय मजुरांना त्यांच्या राज्याच्या सीमारेषेवर नेऊन सोडले. याबरोबरच पुणे, बीड, गोंदिया, ओरिसा, औरंगाबाद या ठिकाणीदेखील प्रवासी सोडण्याची जबाबदारी पार पाडली.

नाशिक : (संदीप भालेराव) परप्रांतीय मजुरांना त्यांच्या राज्यातील सीमारेषेवर नेऊन सोडण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाच्या चालकांनी परराज्यापर्यंत दिलेली सेवा कोणत्याही जोखमीपेक्षा कमी नाही. कोरोनाचा प्रभाव वाढत असल्याच्या काळात नाशिकमधील १२० चालकांनी केवळ मास्क आणि सॅनिटायझर इतक्याच सुरक्षिततेच्या साधनांवर ४७ हजारांपेक्षा अधिक परप्रांतीय मजुरांना त्यांच्या राज्याच्या सीमारेषेवर नेऊन सोडले. याबरोबरच पुणे, बीड, गोंदिया, ओरिसा, औरंगाबाद या ठिकाणीदेखील प्रवासी सोडण्याची जबाबदारी पार पाडली.कोरोनाचा प्रकोप वाढल्यामुळे सुरू झालेल्या लॉकडाउनचा फटका मजुरांना बसला आणि रोजगार नसल्याने त्यांनी आपल्या गावाकडची वाट धरली. हजारो मजुरांची पायपीट सुरू झाल्यानंतर सार्वजनिक प्रवासी वाहतूक बंद असतानाही मजुरांची पायपीट होऊ नये यासाठी गेल्या ९ मेपासून परप्रांतीय मजुरांसाठी बसेस सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. सार्वजनिक प्रवासी वाहतुकीतून सर्वाधिक कोरोना पसरण्याचा धोका लक्षात घेऊन प्रवासी वाहतूक बंद करण्यात आली होती. मात्र अचानक घेण्यात आलेल्या निर्णयामुळे एसटी महामंडळाने ही जाबाबदारी घेतली आणि परराज्यात जाण्यासाठी शंभर ते १२० चालक ‘कोविड योद्धे’ म्हणून तयार झाले.मजुरांचे लोंढे रस्तोरस्ती दिसताच त्यांना बस उपलब्ध करून दिली जात होती. यावेळी मजुरांचे होणारे स्क्रिनिंग फारेसे अचूक होत असेल याची कोणतीही शाश्वती नसतानाही चालकांनी अशा प्रवाशांना घेऊन त्यांच्या राज्यात सोडले. नाशिक शहर, जिल्हा तसेच शेजारी ठाणे जिल्ह्यातून येणाऱ्या मजुरांची वाहतूक करण्याची जोखीम या चालकांनी पत्करली आणि ती यशस्वी पार पाडलीही. सुमारे १२० चालक, १० पर्यवेक्षक अधिकारी आणि दोन आगार व्यवस्थापक या कामी सातत्याने जागत होते. दिवसा आणि रात्री कधीही बसेसची मागणी होत असल्याने या सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांना सतर्क राहावे लागले.रेल्वेने जाणाºया श्रमिकांना रेल्वेस्थानकापंर्यत पोहोचविणे, पुण्याहून सुटणाºया तामिळनाडू रेल्वेसाठी नाशिकहून गेलेल्या २० गाड्या तसेच दिल्लीहून आलेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या जिल्ह्यात पोहोचविण्यासाठी रात्रीतून सेवेत हजर झालेल्या चालकांची सर्वप्रकारची जोखीम पत्करून प्रवाशांना त्याच्या इच्छितस्थळी नेऊन सोडले.

टॅग्स :Nashikनाशिक