सटाणा : शहरासह तालुक्यात वरुणराजाचे जोरदार आगमन झाल्याने शहरासह तालुकावासीय सुखावले आहेत. रात्रीपासून संततधार सुरू असलेल्या पावसाने शेतकऱ्यांमध्ये आशादायक चित्र निर्माण झालेले आहे. यामुळे शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण निर्माण झालेले असून, शेतकऱ्यांनी शेतीच्या कामांना वेग घेतला आहे़ दिवसभर खते व बि बियाणे विक्री केंद्रामध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून आली़ तालुक्यातील सातही मंडळांपैकी मंडल निहाय झालेला पाऊस सटाणा- ९.४ मि.मी., ब्राह्मणगाव १३.५ मि.मी., डांगसांैदाणे १७,१ मि.मी., मुल्हेर ११.४ मि.मी., ताहाराबाद २३.५ मि.मी. वीरगाव ५ मि.मी., तर नामपूर ९.२ मि.मी. इतका पाऊस झाल्याची नोंद झाली आहे. धरणक्षेत्रातदेखील पावसाने हजेरी लावल्याने धरणातील साठा वाढण्यास मदत झालेली आहे़ दरम्यान, २२ जुलै १३ रोजी तालुक्यात सुमारे २५० मि़मी़ इतका पाऊस झाला असून, २२ जुलै १४ अखेर अवघा ८५़ मि़मी़ इतका पाऊस झाला आहे़ यामुळे तालुक्यात अद्यापही पावसाच्या प्रतीक्षेत आहे़
सटाणा तालुक्यात १२ मि़मी. पाऊस
By admin | Updated: July 25, 2014 00:39 IST