कोपरगावच्या चोरट्यासह १२ दुचाकी हस्तगत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2021 04:15 AM2021-03-05T04:15:49+5:302021-03-05T04:15:49+5:30

येवला : दुचाकी चोरीच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर खबऱ्यांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे तालुका पोलिसांच्या विशेष पथकाने कोपरगाव येथील चोरट्यास ...

12 bikes seized from Kopargaon | कोपरगावच्या चोरट्यासह १२ दुचाकी हस्तगत

कोपरगावच्या चोरट्यासह १२ दुचाकी हस्तगत

Next

येवला : दुचाकी चोरीच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर खबऱ्यांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे तालुका पोलिसांच्या विशेष पथकाने कोपरगाव येथील चोरट्यास ताब्यात घेऊन त्याच्याकडील १२ दुचाकी हस्तगत करण्यात यश मिळविले आहे.

शहर व येवला तालुका परिसरामध्ये मागील काही दिवसांपासून मोटारसायकल चोरीचे गुन्हे मोठ्या प्रमाणात वाढले होते. वाढत्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी तत्काळ आरोपीचा शोध घेण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार मालेगावचे अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत खांडवी, व मनमाडचे उपविभागीय पोलीस अधिकारी समरसिंह साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली येवला तालुका पोलीस ठाण्यात विशेष पथक स्थापन करण्यात आले होते. मोटारसायकल चोरीचा तपास चालू असताना दि. १ मार्च रोजी पोलीस पथकास सदर गुन्ह्यातील संशयित कृष्णा शिंदे हा उंदीरवाडी भागामध्ये येणार असल्याची माहिती खबऱ्यांकडून मिळाली होती. त्यावरुन पोलीस निरीक्षक अनिल भवारी, सहायक पोलीस निरीक्षक एकनाथ भिसे, सहायक पोलीस निरीक्षक उज्ज्वलसिंह राजपूत, पोलीस उपनिरीक्षक श्रीराम शिंदे, पोलीस शिपाई सतीश मोरे, आबा पिसाळ, मुकेश निकम, दिनकर पारधी व गणेश सोनवणे यांच्या पथकाने उंदीरवाडी भागामध्ये सापळा लावला. संध्याकाळी सहा वाजेच्या सुमारास एक इसम उंदीरवाडी भागामध्ये स्प्लेंडर मोटारसायकलवर फिरताना आढळून आला. त्याची चौकशी केली असता त्याचे नाव कृष्णा प्रकाश शिंदे (२३, रा.इंदिरानगर, १०५ गल्लीजवळ कोपरगाव जि.अहमदनगर) असल्याचे समजले. त्याच्याकडील स्प्लेंडर मोटारसायकली बाबत विचारपूस केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्याच्यावर संशय बळावल्याने त्याला ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात कसून चौकशी केली असता सदर मोटारसायकल चोरीची असून येवला, कोपरगाव व इतर ठिकाणाहून यापूर्वी बऱ्याच मोटारसायकलींची चोरी केल्याचीही त्याने कबुली दिली. त्यास अटक केल्यानंतर त्याच्याकडून १२ मोटारसायकल हस्तगत करण्यात आल्या आहेत. सदरच्या मोटारसायकल या त्याने येवला, कोपरगाव व अहमदनगर येथून चोरी केल्याचे उघड झाले आहे.

त्यास ६ मार्चपर्यंत पोलीस कोठडी मिळाली असून अधिक तपास सुरू आहे.

===Photopath===

040321\04nsk_47_04032021_13.jpg

===Caption===

येवला तालुका पोलीसांनी ताब्यात घेतलेल्या दुचाकी चोरट्यासह अपर पोलीस अधिक्षक चंद्रकांत खांडवी, उपविभागीय पोलीस अधिकारी समरसिंह साळवे व कर्मचारी.

Web Title: 12 bikes seized from Kopargaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.