शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

वडाळागाव परिसरात  तपासणीत आढळले ११० रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2018 01:14 IST

पंधरवड्यापासून वडाळागाव परिसरात अचानकपणे हातापायांच्या सांधेदुखीच्या आजाराने डोके वर काढल्याने रुग्णसंख्या वाढली आहे. या आजाराचे नेमके निदान होत नसल्याने नागरिकही धास्तावले आहेत. याबाबतचे वृत्त ‘लोकमत’मधून सोमवारी (दि.१८) प्रसिद्ध होताच महापालिका व राज्य शासनाचा आरोग्य विभाग खडबडून जागा झाला.

नाशिक : पंधरवड्यापासून वडाळागाव परिसरात अचानकपणे हातापायांच्या सांधेदुखीच्या आजाराने डोके वर काढल्याने रुग्णसंख्या वाढली आहे. या आजाराचे नेमके निदान होत नसल्याने नागरिकही धास्तावले आहेत. याबाबतचे वृत्त ‘लोकमत’मधून सोमवारी (दि.१८) प्रसिद्ध होताच महापालिका व राज्य शासनाचा आरोग्य विभाग खडबडून जागा झाला. प्रशासनाच्या हिवताप नियंत्रण विभागाचा चमू वडाळागावात दाखल झाला. तातडीने राबविण्यात आलेल्या सर्वेक्षणात एकूण ११० रुग्ण आढळून आले आहेत. त्यामध्ये ६५ रुग्णांना सांधेदुखीचा आजार असल्याचे समोर आले आहे.  वडाळागाव परिसरातील रामोशीवाडा, जय मल्हार कॉलनी, बाराखोली परिसर, राजवाडा, माळी गल्ली, कोळीवाडा, गोपालवाडी, गरीब नवाज कॉलनी, मनपा शाळेचा परिसर या गावठाण भागात अचानकपणे नागरिकांना सांधेदुखीचा त्रास जाणवू लागला. या भागातील रुग्णसंख्या झपाट्याने वाढली. ताप, डोकेदुखी किंवा अन्य कोणताही त्रास नसताना केवळ पायाच्या घोट्यापासून संपूर्ण तळवा आणि हाताच्या बोटांमध्ये होणाऱ्या असह्य वेदना या गूढ आजाराने वडाळागावातील नागरिक हैराण झाले आहेत. हा परिसर नेहमीच सार्वजनिक स्वच्छतेबाबत चर्चेत असतो. महिनाभरापूर्वी विषाणूजन्य तापाच्या आजाराने नागरिक फणफणले होते. तापाचे रुग्ण वाढले होते. ताप नियंत्रणात आल्यानंतर पुन्हा पंधरवड्यापासून हाता-पायांचे पंजे आणि मनगट, घोटा, गुडघेदुखीच्या त्रासाचा सामना करावा लागत असल्याने नागरिक बुचकुळ्यात पडले आहेत. याबाबतचे सविस्तर वृत्त लोकमतमधून प्रसिद्ध करण्यात आले. सांधेदुखीचा गूढ आजार, अशी चर्चा येथे सुरू झाली होती. सदरचे वृत्त सोमवारी झळकताच महापालिक ा हिवताप नियंत्रण विभाग, शहरी आरोग्य विभाग, राज्य शासनाचा हिवताप नियंत्रण विभाग यांना खडबडून जाग आली.तुंबलेल्या गटारीवडाळागाव परिसरात डासांच्या उच्छादासह दूषित पाणीपुरवठा आणि तुंबलेल्या गटारींची समस्याही संसर्गजन्य साथीच्या आजारांच्या फैलावाला कारणीभूत ठरत असल्याचे महापालिकेच्या आरोग्य विभागाचे म्हणणे आहे. त्यामुळे पाणीपुरवठा, भूमिगत गटार दुरुस्ती विभागानेही तत्काळ वडाळागाव परिसरात उपाययोजना करण्याची गरज आहे. माळी गल्ली, गरीब नवाज कॉलनी, कोळीवाडा आदी परिसरात दूषित पाणीपुरवठा पंधरवड्यापासून होत असल्याची तक्रार रहिवाशांनी केली आहे.सकाळीस चमू दाखलसोमवारी सकाळी १० वाजेनंतर आरोग्य प्रशासनाचा संपूर्ण चमू वडाळागावात दाखल झाला. राज्य हिवताप नियंत्रण विभागाच्या कर्मचाºयांनी रक्ताचे नमुनेही तपासणीसाठी संकलन केले. सुमारे पन्नासहून अधिक रुग्णांचे रक्ताचे नमुने घेण्यात आले असून जवळपास ११० रुग्ण वरील परिसरात आढळून आले आहेत.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिका