येवला : तालुक्यातील ११ संशयितांचे कोरोना अहवाल पॉझीटीव्ह आले आहेत. तर ८ बाधित कोरोनामुक्त होवून घरी परतले आहेत. प्रतीक्षेतील १४ स्वॅब अहवालांत १० अहवाल पॉझीटीव्ह आले आहेत. तर एक अहवाल खाजगी लॅबचा आहे.बाधितांमध्ये येवला शहरातील पारखमळा येथील ६५ वर्षीय पुरूष, पारेगाव रोड भागातील २९ व ३० वर्षीय पुरूष, मुल्तानपुरा येथील २६ वर्षीय पुरूष, संतोषी माता नगर येथील ३१ वर्षीय पुरूष, थिएटररोड येथील ६५ वर्षीय महिला तर तालुक्यातील अंदरसुल येथील ४८, २४ व ३३ वर्षीय पुरूष, मुखेड येथील ३५ वर्षीय पुरूष, नगरसुल येथील २२ वर्षीय पुरूष यांचा समावेश आहे.बाभुळगाव येथील अलगीकरण कक्षातून ५ तर नगरसुल येथील डेडीकेटेड कोविड हेल्थ सेंटरमधून तीन असे एकूण ८ बाधित कोरोनामुक्त होवून घरी परतले आहेत. तालुक्यातील एकूण बाधितांची संख्या ७७५ झाली असून आजपर्यंत ६६३ बाधित कोरोनामुक्त होवून घरी परतले आहेत. तर आत्तापर्यंत ४६ बाधितांचा मृत्यू झाला आहे. सद्यस्थितीला बाधित (अॅक्टीव्ह) रूग्ण संख्या ६६ असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. हितेंद्र गायकवाड यांनी दिली.
येवल्यातील ११ अहवाल पॉझीटीव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2020 00:45 IST
येवला : तालुक्यातील ११ संशयितांचे कोरोना अहवाल पॉझीटीव्ह आले आहेत. तर ८ बाधित कोरोनामुक्त होवून घरी परतले आहेत. प्रतीक्षेतील १४ स्वॅब अहवालांत १० अहवाल पॉझीटीव्ह आले आहेत. तर एक अहवाल खाजगी लॅबचा आहे.
येवल्यातील ११ अहवाल पॉझीटीव्ह
ठळक मुद्दे८ बाधित कोरोनामुक्त; आत्तापर्यंत ६६३ बाधित घरी परतले