शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

अंबड वसाहतीत ११ कोटींची कामे मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2018 00:01 IST

अंबड औद्योगिक वसाहतीतील मुख्य तसेच अंतर्गत रस्ते खडीकरण व डांबरीकरण करणे तसेच मलनिस्सारण या आयमाच्या वतीने करण्यात आलेल्या कामांच्या मागणीला आयुक्तांनी हिरवा कंदील दिला असून, यासाठी सुमारे ११ कोटींचा निधी देण्याची तयारी दर्शविण्यात आली आहे.

सिडको : अंबड औद्योगिक वसाहतीतील मुख्य तसेच अंतर्गत रस्ते खडीकरण व डांबरीकरण करणे तसेच मलनिस्सारण या आयमाच्या वतीने करण्यात आलेल्या कामांच्या मागणीला आयुक्तांनी हिरवा कंदील दिला असून, यासाठी सुमारे ११ कोटींचा निधी देण्याची तयारी दर्शविण्यात आली आहे. या कामाचा प्रस्ताव तयार करण्यात आला असून, येत्या महासभेत हा प्रस्ताव मंजुरीसाठी सादर करणार असल्याने उद्योजकांनी महापालिकेच्या प्रस्तावाचे स्वागत केले आहे. अंबड औद्योगिक वसाहतीत मोठ्या प्रमाणात समस्या असून, याबाबत महापालिकेला निवेदन तसेच पत्रव्यवहार करूनही याकडे लक्ष दिले जात नाही. मनपाकडून कायम निधीची कमतरता असल्याचे कारण सांगण्यात येते. मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर अंबड इंडस्ट्रिज अ‍ॅण्ड मॅन्युफॅक्चरर असोसिएशन (आयमा) या संघटनेच्या वतीने अंबड औद्यागिक वसाहतीतील अंतर्गत व मुख्य रस्त्यांची झालेल्या दयनीय अवस्था झाल्याने येथील खडीकरण व डांबरीकरण करावे तसेच मलनिस्सारणाची व्यवस्था करावी यासह विविध मागण्यांसाठी आयुक्तांची भेट घेत निवेदन दिले होते. यास आयुक्तांनी सकारात्मक प्रतिसाद देत अंबड औद्योगिक वसाहतीतील मुख्य तसेच अंतर्गत रस्ते खडीकरण व डांबरीकरण करणे तसेच मलनिस्सारण या आयमाच्या वतीने करण्यात आलेल्या कामांच्या मागणीला आयुक्तांनी हिरवा कंदील दिला असून, यासाठी सुमारे ११ कोटी रुपयांचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. येत्या महासभेत या प्रस्तावाला मंजुरी दिल्यानंतर वसाहतीतील रस्ते चकाचक होणार असल्याने उद्योजकांनीही समाधान व्यक्त केले आहे.उद्योजकांमध्ये समाधानगेल्या अनेक वर्षांपासून अंबड औद्योगिक वसाहतीतील रस्त्यांची अवस्था दयनीय झालेली आहे. याबरोबरच मलनिस्सारणाचीदेखील समस्या कायमची असून, यासाठी आयमाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी वेळोवेळी पाठपुरावा केला होता. आयुक्तांनी समस्या जाणून घेत यासाठी भरीव निधी देण्याची तयारी दर्शविली, ही उद्योजकांसाठी समाधानाची बाब आहे. याआधी मनपाने उद्योजकांच्या मागण्यांकडे पाहिजे तसे लक्ष दिले नव्हते; परंतु आता औद्योगिक वसाहतीत सुधारणा होण्यास मदत होणार आहे.- वरुण तलवार, अध्यक्ष, आयमा

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाMIDCएमआयडीसी