शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

सराईत चोरट्यांकडून ११ दुचाकी जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2019 01:39 IST

कार्यालय, महाविद्यालयांमधील वाहनतळात उभ्या केलेल्या तसेच शहरातील वर्दळीच्या ठिकाणांहून नागरिकांच्या दुचाकी शिताफीने लंपास करत बनावट क्रमांक टाकून त्यांची विक्री करण्याचा ‘उद्योग’ स्थानिक गुन्हे शाखेने उद्ध्वस्त केला आहे. मखमलाबाद, चांदशी शिवारातून दोघा संशयितांच्या मुसक्या आवळून त्यांच्याकडून चोरीच्या ११ दुचाकी हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे.

ठळक मुद्देग्रामीण गुन्हे शाखा : मखमलाबाद, चांदशीमधून संशयित ताब्यात

नाशिक : कार्यालय, महाविद्यालयांमधील वाहनतळात उभ्या केलेल्या तसेच शहरातील वर्दळीच्या ठिकाणांहून नागरिकांच्या दुचाकी शिताफीने लंपास करत बनावट क्रमांक टाकून त्यांची विक्री करण्याचा ‘उद्योग’ स्थानिक गुन्हे शाखेने उद्ध्वस्त केला आहे. मखमलाबाद, चांदशी शिवारातून दोघा संशयितांच्या मुसक्या आवळून त्यांच्याकडून चोरीच्या ११ दुचाकी हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे.याबाबत पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे गुन्हे शाखेच्या पथकाने चांदशी येथून बनावट क्रमांक असलेली मोटारसायकल वापरणारे संशयित गोविंद श्याम पवार (१९, रा. चांदशी, मूळ सय्यद पिंप्री), भूषण ज्ञानेश्वर पिंगळे (१९, तवली फाटा, मखमलाबाद) या दोघांना ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी केली असता एक बजाज पल्सर दुचाकी (बनावट क्रमांकाची) आढळून आली. दोन महिन्यांपूर्वी या दोघा चोरट्यांनी कसारा येथून ही दुचाकी चोरी केली होती.जिल्ह्णातील ग्रामीण भागातील दुचाकी चोरीचा छडालावण्यास ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेला या कारवाईमुळे पुन्हा चांगले यश आले आहे. या चोरट्यांनीसिन्नर, गिरणारे, मातोरी, दरी, मुंगसरा, वडाळीभोई, चांदवड, वणी याग्रामीण भागासह शहरातून देखील काही दुचाकींची चोरी केल्याची कबुली दिली आहे. ‘खाकी’चा हिसका दाखविल्यानंतर चोरट्यांनी दुचाकी दडविलेल्या जागेचा पत्ता सांगितला.चोरट्यांनी चोरी केलेल्या दुचाकी पेठरोड येथील रामशेज किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या जंगलात दडवून ठेवल्या होत्या. जंगलात ज्या पद्धतीने दुचाकी लपविल्या होत्या ती पद्धत पोलिसांना चक्रावून टाकणारीठरली.मात्र पोलिसांनी हा साठा शोधून काढला. दोन पल्सर, चार हिरो स्प्लेंडर, बजाज पल्सर-२२०, सीडी-१००, पॅशन-प्रो, सुपर स्प्लेंडर, बजाज डिस्कव्हर प्रत्येकी एक अशा एकूण ३ लाख ६५ हजार रुपये किमतीच्या ११ दुचाकी ग्रामीण पोलिसांनी जप्त केल्या आहेत.या दोघा सराईत गुन्हेगारांपैकी पवारविरुद्ध यापूर्वी शहरातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये दुचाकी चोरीचे गुन्हे दाखल आहेत. या संशयित आरोपींची पोलिसांनी ‘खास शैली’त झडती घेतली असता त्यांच्याकडून सात गुन्हे उघडकीस आले आहेत. नाशिक तालुका, वणी, सिन्नर औद्योगिक वसाहत, कसारा, म्हसरूळ पोलीस ठाण्यांमध्ये दाखल गुन्हे उघडकीस आले आहेत. हे दोघे सराईत गुन्हेगार असून, त्यांच्याकडून अधिक गुन्हे उघड होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.सात गुन्हे उघडकीस

टॅग्स :PoliceपोलिसtheftचोरीArrestअटक