शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
2
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
3
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
6
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
7
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
8
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
9
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
10
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
11
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
12
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
13
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
14
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
15
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
16
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
17
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
18
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
19
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
20
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!

रेमडेसिविर इंजेक्शन वापरण्यास १०५ रुग्णालयांचा नकार

By श्याम बागुल | Updated: May 25, 2021 02:22 IST

एकेका इंजेक्शनसाठी बारा ते सोळा तास औषधांच्या दुकानाबाहेर रांगा लावण्यास भाग पाडणाऱ्या कोरोनावरील प्रभावी मानल्या गेलेल्या रेमडेसिविरचा वापर गेल्या काही दिवसांपासून अचानक कमी झाला असून, काेरोना रूग्णांची कमी होत असलेली संख्या व दुसऱ्या टप्प्यातील काेरोना लाटेवर रेमडेसिविरची मात्रा कामी येत नसल्याबद्दल आरोग्य तज्ज्ञांनी व्यक्त केलेल्या मतांमुळे रेमडेसिविरचे महत्त्व कमी झाल्याचे मानले जात आहे. 

नाशिक : एकेका इंजेक्शनसाठी बारा ते सोळा तास औषधांच्या दुकानाबाहेर रांगा लावण्यास भाग पाडणाऱ्या कोरोनावरील प्रभावी मानल्या गेलेल्या रेमडेसिविरचा वापर गेल्या काही दिवसांपासून अचानक कमी झाला असून, काेरोना रूग्णांची कमी होत असलेली संख्या व दुसऱ्या टप्प्यातील काेरोना लाटेवर रेमडेसिविरची मात्रा कामी येत नसल्याबद्दल आरोग्य तज्ज्ञांनी व्यक्त केलेल्या मतांमुळे रेमडेसिविरचे महत्त्व कमी झाल्याचे मानले जात आहे. जिल्ह्यातील १०५ रूग्णालयांनी गेल्या काही दिवसांपासून रेमडेसिविरची मागणीदेखील केलेली नाही.     कोरोनानंतर उद्भवणाऱ्या आजारांमध्ये रेमडेसिविरचा वारेमाप वापरदेखील कारणीभूत असल्याचे त्याचबरोबर म्युकरमायसोसिससारख्या गंभीर आजाराचे वाढत असलेले प्रमाण पाहता, कोरोना रूग्णांवर उपचारासाठी वापरल्या जाणाऱ्या औषधांबाबत आता डॉक्टरांकडूनही काळजी घेतली जात असल्याने रेमडेसिविरचे महत्त्व कमी झाल्याचे मानले जात आहे. मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून कोरोनाची दुसरी लाट झपाट्याने पसरली. रूग्णांची संख्या वाढल्याने रूग्णालये अपुरे पडू लागली. ऑक्सिजन, व्हेंटिलेटरचे बेड मिळत नसल्याने अनेकांना प्राण गमवावे लागले. अत्यवस्थ व गंभीर रूग्णांवर उपचारासाठी रेमडेसिविरची एकमेव मात्रा उपयोगी पडत असल्याचे पाहून सर्वच रूग्ण व रूग्णालयांसाठी रेमडेसिविरचा आग्रह धरला गेला. त्यामुळे रेमडेसिविरची मागणी वाढून काळाबाजारही सुरू झाला. एकेका इंजेक्शनसाठी रूग्णांचे नातेवाईक औषधाच्या दुकानांबाहेर चौदा ते सोळा तास रांगेत ताटकळले. 

nनाशिक जिल्ह्यात गेल्या चार दिवसात दररोज रेमडेसिविरच्या मागणीत घट झाली असून, रूग्णालयांनी त्याचा वापर करण्यास नकार दिला आहे. रेमडेसिविरची मागणी जिल्हा प्रशासनाच्या संकेतस्थळावर नोंदवावी लागते. त्यात रूग्णालयाची बेडची संख्या व त्यांना प्रदान करण्यात आलेल्या डोसची माहिती जाहीर केली जात असून, अनेक रूग्णालयांनी आपल्याकडील रूग्णांची माहिती प्रशासनाला देण्यात हात आखडता घेतला आहे. त्यामुळे महिनाभरापूर्वी आठ ते दहा हजारांची मागणी असलेल्या रेमडेसिविर इंजेक्शनची मागणी आता तीनशे ते चारशेच्या घरात आली आहे. रेमडेसिविरच्या वापराबाबत प्रश्नचिन्हरेमडेसिविरच्या वापराबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याने बुधवार (दि. १९) रोजी ७५२ रेमडेसिविरची मात्रा जिल्ह्याला प्राप्त झाली. मात्र, ११७ रूग्णालयांनी त्यांची मागणी नोंदवलीच नाही. हेच प्रमाण शुक्रवार (दि. २१) रोजी कायम राहिले. अवघ्या ३०१ रेमडेसिविरची मागणी नोंदविण्यात आली व ७५ रूग्णालयांनी त्यांची मागणीच नोंदवलेली नव्हती. तर शनिवार (दि. २२) रोजी ४८१ रेमडेसिविर प्राप्त झाली, त्याचवेळी १०५ रूग्णालयांनी ही मात्रा घेण्यास नकार दिला आहे.

टॅग्स :NashikनाशिकHealthआरोग्यmedicineऔषधं