या शिबिरात जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र शिंदे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी महेश बच्छाव, उपमुख्य कार्यकारी अधिकारी आनंदराव पिंगळे, ईशाधीन शेलकंदे, शिक्षणाधिकारी डॉ. वैशाली झनकर, कार्यकारी अभियंता सुनंदा नरवडे यांनी रक्तदान केले. रक्तदान करणाऱ्या सर्व अधिकारी व कर्मचारी यांना जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, उपाध्यक्ष डॉ. सयाजीराव गायकवाड, मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले. शासकीय रक्तपेढीस ज्या वेळेस रक्तसाठ्याची आवश्यकता भासेल, त्यावेळी तालुका पातळीवर शिबिर घेण्याचा संकल्प सोडण्यात आला. जिल्हा संदर्भ रुग्णालयाचे डॉ. पुरी, डॉ. दिनेश पाटील, महेंद्र पवार, प्रशांत केळकर, जी.पी. खैरनार, फय्याज खान, विजय देवरे, रवींद्र आंधळे, उत्तम चौरे, रणजित पगारे, निवृत्ती बगड, बाळासाहेब कोठुळे, जालिंदर चौधरी आदी यावेळी उपस्थित होते.
जिल्हा परिषदेत १०२ बाटल्या रक्तसंकलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:13 IST