नाशिक : नवीन व्यवसाय टाकण्यासाठी माहेरून दहा लाख रुपये आणावेत म्हणून विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात पतीसह दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ याबाबत म्हसरूळच्या पाटणी पार्क येथे कीर्ती तुषार निकाळे (२५) यांनी पंचवटी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे़ यामध्ये म्हटले आहे की, नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी माहेरून दहा लाख रुपये आणले नाहीत म्हणून पती तुषार निकाळे, सासू व सासरे हे चारित्र्यावर संशय घेऊन शारीरिक व मानसिक छळ करत आहेत़ या छळाला कंटाळून पंचवटी पोलीस ठाण्यात पती तुषार निकाळे व सासू, सासर्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
दहा लाखांसाठी विवाहितेचा छळ
By admin | Updated: May 25, 2014 16:30 IST