शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

दहा दिवसांचे  बौद्धाचार्य श्रामणेर शिबिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2019 23:59 IST

भारतीय बौद्ध महासभा त्र्यंबकेश्वर तालुक्याच्या वतीने येथे दहा दिवसांचे बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराच्या नित्यक्रमातील एक भाग म्हणून दररोज प्रभातफेरी काढली जाते.

त्र्यंबकेश्वर : भारतीय बौद्ध महासभा त्र्यंबकेश्वर तालुक्याच्या वतीने येथे दहा दिवसांचे बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराच्या नित्यक्रमातील एक भाग म्हणून दररोज प्रभातफेरी काढली जाते.दररोज काढण्यात येणाऱ्या फेरीचे ठिकठिकाणी स्वागत करण्यात येते. लताबाई ढेंगळे व लता गांगुर्डे, कल्पना सोनवणे, मीना सोनवणे रोज फेरी निघाल्यापासून ते समारोप होईपर्यंत श्रामनेर बौद्धाचार्य यांच्याबरोबर फेरीपुढे फुलांचा सडा टाकत स्वागत करत आहे. प्राची तिवडे, बेबी सोनवणे, माधुरी, समीक्षा सोनवणे या संघाची पूजा करतात. रविवारी (दि.२४) या शिबिराचा समारोप होणार आहे.येथील अमृतकुंभ अतिथी निवासमधील हॉलमध्ये आयोजित केलेले आतापर्यंतचे हे तिसरे शिबिर असल्याने ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. मागील शुक्रवारपासून या श्रामनेर शिबिरास प्रारंभ झाला आहे. शिबिर काळात दररोज भगवान गौतम बुद्ध व त्यांचा धम्म यावर विस्तृत माहिती दिली जाते.डॉ. बाबासाहेब आंबेडकर, रमाई आंबेडकर त्यांचे जीवनकार्य आदींचीदेखील ओळख करून दिली जाते. शिबिरांर्तगत दररोज  सकाळी एक तास विपश्यना केली जाते. त्यानंतर बुद्धवंदना होते.यानंतर गावातून प्रभात फेरी काढली जाते.जलदानविधीबाबत मार्गदर्शनशिबिरात सहभागाी श्रामनेरांना बारसे (नामकरण), वाढदिवस, विवाह वाढदिवस, जलदानविधी आदींबाबत बौद्ध धर्मानुसार विधी शिकविले जातात. तसेच संघाचे आचारविचार कसे असावेत, श्रामणेर बौद्धाचार्यांचे आचारविचार कसे असावेत याबद्दलही माहिती दिली जाते. शिबिरात सुमारे २५ ते ३० विषय शिकविले जातात. भगवान गौतम बुद्धांचे चरित्र, त्यांचे राजकीय जीवन, त्याचे कार्य याविषयी माहिती दिली जाते. 

टॅग्स :trimbakeshwarत्र्यंबकेश्वरNashikनाशिक