दहा कोटी घरपट्टीची वसुली

By Admin | Updated: March 11, 2017 01:47 IST2017-03-11T01:47:36+5:302017-03-11T01:47:55+5:30

सिडको : महापालिकेच्या सिडको विभागीय कार्यालयाच्या वतीने घरपट्टी व पाणीपट्टी थकबाकी दारांकडे धडक वसुली मोहीम सुरू असून, आजपर्यंत घरपट्टीची सुमारे दहा कोटी रुपयांची वसुली झाली

10 crore house tax recovery | दहा कोटी घरपट्टीची वसुली

दहा कोटी घरपट्टीची वसुली

 सिडको : महापालिकेच्या सिडको विभागीय कार्यालयाच्या वतीने घरपट्टी व पाणीपट्टी थकबाकी दारांकडे धडक वसुली मोहीम सुरू असून, आजपर्यंत घरपट्टीची सुमारे दहा कोटी रुपयांची वसुली झाली असल्याची माहिती मनपा सूत्रांनी दिली.
मनपाच्या सिडको विभागीय कार्यालयास मार्चअखेरपर्यंत घरपट्टीचे सुमारे पंधरा कोटींचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. ज्या थकबाकीदारांकडे एक लाख रुपयांच्यावर थकबाकी आहे, अशा थकबाकी दारांकडे मनपाच्या वतीने ढोल वाजवून वसुली करण्यास सुरुवात केली असून, गेल्या दोन दिवसांपूर्वी मनपाच्या वतीने पाथर्डीफाटा येथील एका हॉटेलसह एका पतसंस्थेसमोर ढोल वाजवून वसुली केली.
घरपट्टीच्या सुमारे पंधरा कोटींच्या उद्दिष्टापैकी आजपर्यंत सुमारे दहा कोटी रुपयांची थकबाकी वसूल झाल्याची माहिती विभागीय अधिकारी सुनीता कुमावत
यांनी दिली. आजपर्यंत थकबाकीपोटी पाच ते सहा मिळकती जप्त  करण्यात आल्या असून, यापुढील काळातही ही मोहीम सुरूच राहणार आहे. (वार्ताहर)

Web Title: 10 crore house tax recovery