शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Blast: २ वर्षांपासून सुरू होता स्फोटकं जमवण्याचा जीवघेणा खेळ; डॉ शाहीन शाहिदची कबुली
2
प्रशांत किशोर यांची भविष्यवाणी खरी होणार? बिहार निवडणुकीच्या एक्झिट पोलने केले शिक्कामोर्तब!
3
रेखा झुनझुनवालांच्या पोर्टफोलिओतील पेनी स्टॉकची पुन्हा भरारी! ६ महिन्यात तोटा भरुन काढत ३४ टक्के वाढ
4
जपानचे १,००,००० येन भारतामध्ये किती रुपये होतात? तुम्हाला फायदा होतो की नुकसान, जाणून घ्या
5
सीमेपासून अवघ्या २० किमी अंतरावर नवं आव्हान?; बांगलादेश सैन्यानं भारताला दिलेला शब्द मोडला
6
Tata घराण्यात मोठा बदल, नोएल टाटांच्या मुलाला मिळाली मोठी जबाबदारी; परदेशातून घेतलंय शिक्षण
7
एके-47 ठेवणाऱ्या डॉ. शाहीनचे थेट महाराष्ट्राशी कनेक्शन; जैशच्या महिला विंगची निघाली मास्टरमाईंड
8
“जनतेची काम करतो म्हणून प्रत्येक समाज घटक ८-८ लाखाच्या फरकाने निवडून देतात”: अजित पवार
9
दिल्लीतील स्फोटामुळे 'कॉकटेल २'चं शूट पुढे ढकललं, आजपासूनच होणार होती सुरुवात
10
एकही रुपया न गुंतवता दरवर्षी कमावू शकता ₹२.८८ लाख; पाहा PPF च सीक्रेट, लोकही विचारतील कसं केलं?
11
धर्मेंद्र यांना रुग्णालयातून डिस्चार्ज; सनी देओलच्या टीमने दिलं स्टेटमेंट, 'त्यांचं तुमच्यावर..."
12
Govinda Hospitalised : ६१ वर्षीय गोविंदाची अचानक तब्येत बिघडली, झाला बेशुद्ध, जुहूच्या रुग्णालयात दाखल
13
ATP Finals 2025: खेळ पाहण्यासाठी आलेल्या दोन चाहत्यांचा मृत्यू, क्रीडाविश्वात शोक!
14
इंजिनीअरिंग, फार्मसी, एमबीएची सीईटी वर्षातून दोनदा, यंदा एप्रिलमध्ये पहिली, तर मेमध्ये दुसरी सीईटी परीक्षा
15
महायुतीच्या त्सुनामीमुळे विरोधकांत भीती, आशिष शेलार यांचा टोला
16
आजचे राशीभविष्य, १२ नोव्हेंबर २०२५: आजचा दिवस आनंदी; पण 'या' राशीला स्त्रीमुळे अडचणीचा धोका
17
पोस्टरमुळे समोर आला डॉक्टरांचा दहशतवादी कट; स्फोटकांचा तपास यशस्वी, पण दिल्लीत कशी झाली चूक?
18
Delhi Blast: दिल्ली बॉम्बस्फोटावर पाकिस्ताननं काय म्हटलं? तुर्कीनं तर हद्द ओलांडली!
19
Dharmendra Health Update: धर्मेंद्र यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज, डॉक्टरांनी दिले हेल्थ अपडेट
20
कार चालविणाऱ्या डॉक्टरचे दहशतवादी मॉड्युलशी संबंध, ठार झालेल्यांत समावेश

जिल्ह्यात आढळले १ हजार ४१९ रुग्ण; मृतांचा आकडा वाढून पोहचला ९९१वर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2020 20:45 IST

बुधवारी दिवसभरात जिल्हयात १ हजार ४५३ संशियत रु ग्ण उपचारासाठी दाखल झाले आहेत. यापैकी १ हजार १७७ रु ग्ण शहरातील आहे.

ठळक मुद्देशहराची कोरोनाबाधितांची एकूण संख्या आता ३२ हजार ८९३ ग्रामिणचा कोरोनाबाधितांचा आकडा ११ हजार ६२८

नाशिक : जिल्ह्याची कोरोनाबाधितांची रुग्णसंख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढू लागली आहे. बुधवारीसुध्दा (दि.९) जिल्ह्यातील रुग्णसंख्येचा आलेख चढताच राहिला. दिवसभरात १ हजार ४१९रुग्ण आढळून आले. यामुळे एकूण रु ग्णसंख्या ४७ हजार ७४४ इतकी झाली आहे. सोमवारपासून जिल्ह्यात उपचारार्थ दाखल रुग्णांचा मृत्यू होण्याचेही प्रमाण वाढले आहे. मंगळवारी २० तर बुधवारी १८ रुग्ण दगावल्याने बळींचा एकूण आकडा ९९१वर पोहचला आहे. दिवसभरात ५६२ रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली. मृत्यू झालेल्या रुग्णांमध्ये शहरातील नऊ,ग्रामिणमध्ये आठ तर मालेगावातील एका रुग्णांचा समावेश आहे.मागील दोन दिवसांपासून शहरासह जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढू लागली आहे. सण-उत्सवाच्या काळापासून कोरोनाग्रस्तांचा आलेख उंचावत असून अद्याप घसरण होत नसल्याने प्रशासनही चिंतेत सापडले आहे. बुधवारी दिवसभरात जिल्हयात १ हजार ४५३ संशियत रु ग्ण उपचारासाठी दाखल झाले आहेत. यापैकी १ हजार १७७ रु ग्ण शहरातील आहे. शहराची कोरोनाबाधितांची एकूण संख्या आता ३२ हजार ८९३ झाली आहे, तर ग्रामिणचा कोरोनाबाधितांचा आकडा ११ हजार ६२८ इतका झाला आहे. शहरात आतापर्यंत २६ हजार ८८६ रुग्ण तर ग्रामिणमध्ये ८ हजार २८० रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मालेगाव मनपा हद्दीत एकूण रुग्णसंख्या २ हजार ९७७ इतकी असून त्यापैकी २ हजार २६३ रुग्ण बरे झाले आहेत. बुधवारी शहरात एकूण ९७२, ग्रामिणमध्ये ४१३ तर मालेगावात ३४ नवे रुग्ण आढळले. शहरासह जिल्ह्याच्या ग्रामिणमध्ये कोरोनाचे संक्रमण वाढता वाढत असल्याने गाव, तालुकापातळीवरसुध्दा नागरिकांनी अधिकाधिक सतर्कता बाळगण्याची गरज आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ३७ हजार ६३९ रुग्ण बरे झाले आहेत तर ९ हजार ११४ रुग्ण सध्या उपचार घेत आहेत. १ हजार ९५० रुग्णांचे नमुना चाचणी अहवाल अद्याप प्रलंबित आहेत.

टॅग्स :nashik collector officeनाशिक जिल्हाधिकारी कार्यालयCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस