शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

३४२ कोटी अडकले; ‘येस’ बॅँकेला ‘नो’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2020 00:37 IST

आर्थिक अडचणींमुळे निर्बंध घालण्यात आलेल्या येस बॅँकेत नाशिक महापालिकेचे किमान ७० कोटी रुपये अडकले असून, त्यामुळे ऐन मार्चअखेर ही स्वायत्त संस्था अडचणीत आली आहे. नियमित खर्चाबरोबरच ठेकेदारांची देयके देण्यातदेखील अडचणी निर्माण झाल्या आहेत. दरम्यान, गुरुवारी (दि.५) रात्रीच आयुक्तांनी दिलेल्या सूचनेनुसार शुक्रवारी (दि.६) दिवसभरातील सर्व भरणा येस बॅँकेत भरणे बंद करून तो एसबीआयमध्ये जमा करण्यात आला.

ठळक मुद्देस्मार्ट सिटीचे १४ कोटी : मनपाचे २२ खाते एसबीआयकडे वर्ग

नाशिक : आर्थिक अडचणींमुळे निर्बंध घालण्यात आलेल्या येस बॅँकेत नाशिक महापालिकेचे किमान ७० कोटी रुपये अडकले असून, त्यामुळे ऐन मार्चअखेर ही स्वायत्त संस्था अडचणीत आली आहे. नियमित खर्चाबरोबरच ठेकेदारांची देयके देण्यातदेखील अडचणी निर्माण झाल्या आहेत. दरम्यान, गुरुवारी (दि.५) रात्रीच आयुक्तांनी दिलेल्या सूचनेनुसार शुक्रवारी (दि.६) दिवसभरातील सर्व भरणा येस बॅँकेत भरणे बंद करून तो एसबीआयमध्ये जमा करण्यात आला. याशिवाय स्मार्ट सिटी कंपनीचे सुमारे साडे चारशे कोटी रुपये या बॅँकेत अडकले होते परंतु कंपनीने टप्प्याटप्प्याने ही रक्कम काढून घेतल्याने कंपनीचे १४ कोटी रुपयेच अडकले आहेत. तर शिक्षण विभागाचे १५ कोटी असे एकूण शंभर कोटी रुपये अडकले आहेत.येस बॅँकेची आर्थिक स्थिती खालावली असून, ती आणखी बिघडू नये यासाठी रिझर्व्ह बॅँकेने गुरुवारी (दि.५) या बॅँकेवर आर्थिक निर्बंध घातले आहेत. त्यानुसार कोणत्याही खातेदाराला आता केवळ ५० हजार रुपयेच काढता येतील. त्यामुळे नाशिकमधील हजारो खातेदारांची रक्कम त्यात अडकली आहे. परंतु त्याचबरोबर नाशिक महापालिकेचे किमान ७० कोटी रुपये अडकल्याचे प्राथमिक अंदाज असल्याचे आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी सांगितले. या बॅँकेत महापालिकेची नक्की किती रक्कम अडकली आहे, याचा शोध घेतला जात असून, सायंकाळपर्यंत ते स्पष्ट होईल.पाच वर्षांपूर्वी महापालिकेने आपले बहुतांश व्यवहार या बॅँकेकडे वर्ग केले असून त्यांच्या माध्यमातून सहा ठिकाणी सीएफसी (कॉमन फॅसीलीटी सेंटर) चालवले जाते. त्यात जन्ममृत्यू दाखल्याच्या शुल्कापासून घरपट्टी पाणीपट्टी आकारणीपर्यंत सर्व प्रकारची रक्कम जमा केली जाते. आयुक्त गमे यांनीच दिलेल्या माहितीनुसार महापालिकेचे २२ प्रकारचे खाते या बॅँकेत असून त्यात सर्व प्रकारची रक्कम भरली जाते. परंतु रिझर्व्ह बॅँकेने निर्बंध घातल्यापासून या बॅँकेतील सर्व प्रकारचा भरणा रात्रीपासूनच बंद करण्यात आला असून वेबसाइटवरून आॅनलाइन भरणा येस बॅँकेत होऊ नये यासाठी ती डिसेबल करण्यात आल्याची माहिती आयुक्त गमे यांनी दिली.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाbankबँकMONEYपैसा