शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

यंदाही ‘बाप्पा’ रुसले अन्‌ मूर्ती कारागीर आर्थिकदृष्ट्या त्रासले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 04:30 IST

मनोज शेलार कोरोनामुळे बाप्पा रुसल्याने यंदाही बाप्पांची मूर्ती तयार करणारे कारागीर आर्थिकदृष्ट्या त्रासले आहेत. लाखोंची उलाढाल करणाऱ्या नंदुरबारातील गणेशमूर्ती ...

मनोज शेलार

कोरोनामुळे बाप्पा रुसल्याने यंदाही बाप्पांची मूर्ती तयार करणारे कारागीर आर्थिकदृष्ट्या त्रासले आहेत. लाखोंची उलाढाल करणाऱ्या नंदुरबारातील गणेशमूर्ती उद्योगाला यंदाही लाखो रुपयांचा फटका बसणार आहे. मूर्तीची उंची केवळ चार फुटांच्या मर्यादेमुळे येथील मूर्ती कारखाने यंदाही ठप्प आहेत. मोजक्याच कारखान्यांमध्ये सध्या मूर्ती बनविण्याचे काम सुरू आहे. दरम्यान, गेल्या वर्षी बनवून ठेवलेल्या पाच ते १८ फूट उंचीच्या मूर्ती यंदाही तशाच पडून आहेत. त्यामुळे कारागिरांना त्या मूर्ती सांभाळणे आता जिकिरीचे ठरू लागले असून जागाभाडे व इतर खर्च करणे अवघड ठरत आहे. नंदुरबारातील गणेशमूर्ती बनविण्याचा उद्योग राज्यात प्रसिद्ध आहे. पेण येथील प्रसिद्ध गणेश मूर्तीनंतर नंदुरबारच्या मूर्तींना मागणी असते. मूर्ती बनविण्याचे नंदुरबारात जवळपास २५ कारखाने आहेत. त्या ठिकाणी दरवर्षी एक फुटापासून २० फुटापर्यंतच्या गणेशमूर्ती तयार केल्या जातात. वर्षातील किमान पाच ते सहा महिने या कारखान्यांमध्ये काम सुरू असते. नंदुरबारसह राज्यातील आठ ते दहा जिल्ह्यांत तसेच मध्यप्रदेश व गुजरात राज्यातील अनेक भागांत येथील मूर्ती नेल्या जातात. त्यासाठी तीन ते चार महिने आधी बुकिंग करून त्याप्रमाणे मूर्ती तयार करून घेण्याकडे सार्वजनिक मंडळांचा कल असतो. गेल्या वर्षी देखील अनेक मंडळांनी पाच ते २० फूट उंचीच्या मूर्ती बुकिंग केल्या होत्या. कारखान्यांमधून देखील हजारो मूर्ती तयार करण्यात आल्या होत्या; परंतु ऐनवेळी शासनाने कोरोनाच्या कारणामुळे मूर्तीची उंची चार फुटांपर्यंतच निर्धारित केल्याने मूर्ती कारागिरांना मोठा फटका बसला. हजारो मूर्ती आजही नंदुरबारातील मूर्ती कारखान्यांमध्ये ठेवण्यात आल्या असल्याचे चित्र आहे. यंदा तरी मूर्तीच्या उंचीबाबत निर्णय शिथिल होईल, अशी अपेक्षा मूर्ती व्यावसायिकांना होती. त्यामुळे गेल्या वर्षभरापासून या मूर्ती सांभाळून ठेवण्यात आल्या; परंतु यंदाही चार फूट उंचीचा निर्णय कायम राहिल्याने आणखी वर्षभर या मूर्ती सांभाळण्याची कसरत करावी लागणार आहे. वास्तविक नंदुरबारातील मूर्ती कारागिरांना प्रशासन किंवा नगरपालिकेने वेगळी जागा दिलेली नाही. कारागिरांना शहराच्या मध्यवस्तीत किंवा शहरालगत मोकळ्या जागा भाड्याने घेऊन त्या ठिकाणी मूर्ती तयार करण्याचा कारखाना तात्पुरता उभारावा लागतो; परंतु गेल्या वर्षाच्या मोठ्या मूर्ती एका जागेवरून दुसऱ्या जागेवर नेणे शक्य नसल्याने अनेकांनी आहे त्याच जागा भाड्याने कायम ठेवल्या. बँकेतून कर्ज काढून, काहींनी खासगी सावकाराकडून व्याजाने पैैेसे घेऊन तर काहींनी दागिने गहाण ठेवून कर्ज काढले आहे. त्या कर्जाचे हप्ते आणि जागांचे भाडे व होणारा मूर्ती विक्रीचा व्यवसाय यांचा ताळमेळ बसत नसल्याने मूर्ती कारखानदार आर्थिकदृष्ट्या हैराण झाले आहेत.

यंदा चार फूट उंचीच्या मूर्तीचा कायम असलेला निर्णय, कोरोनामुळे सार्वजनिक मंडळांची कमी झालेली संख्या, ‘एक गाव एक गणपती’चा ट्रेंड आणि कोरोनाचे नियम यामुळे मूर्ती विक्रीवर मोठा परिणाम होत आहे. शिवाय शाडू मातीच्या घरगुती मूर्ती तयार करण्याकडे देखील कल वाढू लागला आहे. या सर्वांचा परिणाम म्हणून गेल्या वर्षी दरवर्षाच्या सरासरीच्या तुलनेत केवळ ७० टक्के मूर्ती विक्री झाल्या होत्या. यंदा देखील तीच स्थिती राहणार आहे. त्यामुळे अनेक कारागिरांनी यंदा ठरावीक संख्येतच मूर्ती तयार केल्या आहेत. काही कारखाने तर यंदा बंदच आहेत. त्यामुळे नंदुरबारातील मूर्ती उद्योग ठप्प झाला आहे. लाखोंची होणारी उलाढाल निम्म्यावर आली आहे. परप्रांतीय मूर्ती विक्रेते देखील यंदा कमी प्रमाणावर येण्याची शक्यता आहे.

या सर्वांचा परिणाम पाहता नंदुरबारातील मूर्ती उद्योग पुन्हा उभा राहण्यासाठी मोठा कालावधी लागणार आहे. कर्जबाजारी झालेल्या मूर्ती कारागिरांना आर्थिक साहाय्य मिळवून देण्यासाठी शासन, प्रशासनातर्फे प्रयत्न झाला पाहिजे. तरच पुढील वर्षी हा उद्योग तग धरू शकेल, अन्यथा नंदुरबारच्या वैभवशाली परंपरा लाभलेल्या मूर्ती उद्योगाचा केवळ इतिहासच पुढील पिढीला वाचायला मिळेल, अशी भीती व्यक्त केली जात आहे.