लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा पदवीदान सोहळा शहरातील जिजामाता महाविद्यालयात पार पडला़ अध्यक्षस्थानी विद्यापीठाच्या मानव्य विद्या व सामाजिक शास्त्र विद्याशाखेचे संचालक प्रा़डॉ़ उमेश राजदेरकर होत़े प्रमुख अतिथी म्हणून सुप्रसिद्ध अहिराणी कवी सुभाष अहिरे, संस्थेच्या अध्यक्षा शोभा मोरे, धुळे येथील एसएसव्हीपीएस महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ़ मनोहर पाटील, प्राचार्य डा़ॅ़ टी़ए़मोरे उपस्थित होत़े यावेळी विद्यापीठाचे विभागीय संचालक प्रा़ डॉ़ धनंजय माने यांनी स्वागताध्यक्ष पद भूषवल़े प्रारंभी ज्ञानाची निरंतर साधना हे विद्यापीठ गीत विद्यार्थिनींनी सादर केल़े यानंतर सरस्वती पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आल़े प्रसंगी मुक्त विद्यापीठाच्या विविध शाखांमधून पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण यशस्वीपणे प्राप्त करणा:या विद्याथ्र्याना मान्यवरांच्या हस्ते पदवी प्रदान करण्यात आली़ कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात प्रा़डॉ़ धनंजय माने यांनी मुक्त विद्यापीठाच्या कामाचा आढावा घेत उच्चशिक्षणापासून वंचित राहणा:या विद्याथ्र्यासाठी संधी उपलब्ध करुन देण्याचे काम मुक्त विद्यापीठाने केले असून याद्वारे अनेकांनी उच्चशिक्षणाचे स्वपA पूर्ण केल्याचे सांगितल़े दुर्गम भागातील वंचित विद्याथ्र्याना मुक्त विद्यापीठाने मोठा आधार दिल्याचेही ते म्हणाल़े प्राचार्य मनोहर पाटील यांनी मुक्त विद्यापीठाचा अभ्यासक्रम अतिशय गुणवत्ता पूर्ण असून विद्याथ्र्याना आयुष्यात त्याचा लाभ होणार असल्याचे सांगितल़े संस्थेच्या अध्यक्षा शोभा मोरे यांनी मुक्त विद्यापीठाने नेहमीच शिक्षणाचा प्रसार ग्रामीण भागात केला आह़े विद्याथ्र्याना त्याचा लाभ झाला आह़े विद्याथ्र्याना करियरसाठी मुक्त विद्यापीठाचा पदवी हा यशाचा मार्ग असल्याचे सांगितल़े अध्यक्षीय भाषणात डॉ़ राजदरेकर यांनी सांगितले की उच्च शिक्षणापासून वंचित असलेल्या सर्व विद्याथ्र्याना मुक्त विद्यापीठाने शिक्षणाचे दालन उपलब्ध करुन दिले आह़े यातून गरजूंना आजवर लाभच झाला आह़े या शिक्षणातून त्यांनी समाज घडवण्यासाठी सहाय्य केले पाहिजे असे सांगितल़े सूत्रसंचालन डॉ़ शशिकांत बोरसे यांनी केल़े यशस्वीतेसाठी प्रा़ सुकलाल मराठे, किशोर शिंदे, चंद्रकांत सोनार, वंदना ङोंडे, संजय आहेर, मिलींद ठाकरे, सचिन सूर्यवंशी आदींनी परिश्रम घेतल़े
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाकडून विद्याथ्र्याना पदवी प्रदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2019 12:21 IST