रोडाल्यांमधून याहा मोगी मातेचा गजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2020 12:35 PM2020-02-22T12:35:56+5:302020-02-22T12:36:02+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क अक्कलकुवा : दुर्गम भागातील डाब, मोलगी व देवमोगरा येथे भरणाऱ्या याहा मोगी माता यात्रोत्सवनिमित्त अवघ्या सातपुड्यात ...

Yaha mogi mother alarm from the road | रोडाल्यांमधून याहा मोगी मातेचा गजर

रोडाल्यांमधून याहा मोगी मातेचा गजर

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
अक्कलकुवा : दुर्गम भागातील डाब, मोलगी व देवमोगरा येथे भरणाऱ्या याहा मोगी माता यात्रोत्सवनिमित्त अवघ्या सातपुड्यात भक्तीमय वातावरण निर्माण झाले आहे. होबयात्रा वैयक्तीकपणे यात्रेला जाणाºया भाविकांकडून रोडाल्यांच्या माध्यमातून याहा मोगी मातेची आराधना केली जात आहे. तर सोंगाड्यांच्या कार्यक्रमातूनही मातेचा गजर होत आहे.
याहा मोगी माता यात्रेला पौराणिक परंपरेनुसार सुरुवात झाली आहे. नोकरी तथा कामधंद्यानिमित्त बाहेर गेलेले आदिवासी बांधव मुळगावी परतले आहे. या बांधवांच्या उपस्थितीत यात्रोत्सव साजरा केला जात आहे. बहुतांश बांधव याहा मोगी मातेच्या दर्शनासाठी मोलगी, डाब व गुजरामधील देवमोगरा येथे रवाना झाले आहे. भाविकांची संख्या वाढण्याची शक्यता असल्याने तिन्ही ठिकाणी ट्रस्टींमार्फत विविध सुविधा करण्यात आल्या आहे.
यात्रेनिमित्त निसर्गपूजक आदिवासी बांधवांच्या प्रतिक्षेतील याहा मोगी यात्रोत्सवाला सुरुवात झाली आहे. या उत्सवानिमित्त मौखिक साहित्य परंपरा जतन करण्याचे कार्य आदिवासींमधील पुंजारा, बोडवा व मोडवी यांनी केले असून ही परंपरा सांस्कृतिक व जीवनमुल्यांच्या दृष्टीने समृद्ध असल्याचे ते पटवून देत आहे. त्यात डाब राजमंडलातील राजे व जनता समुहाने भटकंती करून जंगलातील कंदमुळे, फळ-फुल गोळा करीत होते. यासह दाब मंडळातील कोलपासा, देवगोंदारी, विन्यादेव, राजापांठा, तारहामहल, उमरावाणू, हेलबदेव, आगीपांडर, गिंबदेव, पोरबदेव, सिडगोवा, बाबा बाहगोºया या देवतांचा परिचय करुन देत सामुहिक जीवन व शेती करण्याच्या पद्धती मौखिक परंपरेनुसार सांगण्यात येत आहे. शिवाय याहा मोगी मातेच्या जन्मापासून विवाहापर्यंतचा प्रवासावर कथा मांडल्या जात आहे. होबयात्रेत सहभागी भाविकांकडून रोडाली, मौखिक कथा यांंच्या माध्यमातून याहा मोगी मातेची आराधना केली जात आहे. तर मोलगी, डाब व देवमोगरा येथेही कथा म्हटल्या जात आहे.

देवमोगरा ता. सागबारा येथील याहा मोगी मातेचे मंदिर गुरुवारी पहाटेस विधिवत व पारंपारिक पद्धतीने पूजन करून भाविकांसाठी खुले करण्यात आले. त्यानंतर दर्शनासाठी येणाºया भाविकांची संख्या वाढू लागली. त्यात संपूर्ण भारतातून आदिवासी बांधवांचा समावेश असून बहुतांश भाविक हे धडगाव व अक्कलकुवा तालुक्यातून जाणे सोयीचे ठरत असल्याने ते याच मार्गाने जात आहे. तर उत्तर भारतातील भाविक कंवाट व वडफळीमार्गे देवमोगरा येथे पोहोचत आहे.

Web Title: Yaha mogi mother alarm from the road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.