लोकमत ऑनलाईननंदुरबार, दि़ 15 : नंदुरबार तालुक्यातील शिंदे येथील ग्रामस्थ व तरुण मित्र मंडळातर्फे लोकसहभागातून जलसंधारणाची कामे करण्यात येत आहेत़ शनिवारी गावात नाला खोलीकरणाचे कामे करण्यात आली़या वेळी सरपंच मंगलाबाई भिल, उपसरपंच गिरधर पटेल, अंशुमन पाटील, शंकरदादा पाटील, ग्रामसेवक व्ही़डी़ महाले, नारायण पाटील, जाधव पाटील, किशोर पाटील भिला पाटील, भगवान पाटील रवी पटेल, भबुता पाटील, बन्सी पाटील, लिंबा कोळी आदी उपस्थित होत़ेशिंदेसह लगतच्या परिसरातील पाण्याची पातळी दिवसेंदिवस खालावत आह़े त्यामुळे पाण्याचे नियोजन करणे गरजेचे आह़े या ठिकाणी शेतक:यांच्या कुंपनलिकाही आटल्या आहेत़ परिणामी उन्हाळ्यात प्रचंड पाणी टंचाईचा सामना करावा लागत असतो़ त्यामुळे ग्रामस्थांनी एकत्र येत खोलीकरणाचे कामे हाती घेतली आहेत़ यात युवकांचा मोठय़ा संख्येने सहभाग मिळत असल्याचे सांगण्यात येत आह़े पाण्याची पातळी वाढविण्यासाठी पाणी जमिनीत जीवरणे महत्वाचे असल्याचे सांगण्यात आल़े
लोकवर्गणीतून शिंदे येथे नाला खोलीकरणाचे काम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2018 12:10 IST