शहरं
Join us  
Trending Stories
1
Ajit Pawar : 'पवार साहेबांच्या तब्येतीची काळजी घ्यायला हवी होती, मी जर त्यांच्याबरोबर... '; अजितदादांनी सांगितला २००४ चा प्रसंग
2
आदित्य ठाकरेंचा भाजपा-मनसेवर हल्लाबोल; "ज्यांनी परप्रांतीयांना मारलं अशा मनसेचा..."
3
'मालेगावचा कट करकरेंमुळे उघडा पडला अन्...'; २६/११ चा उल्लेख करत ठाकरे गटाचा मोठा दावा
4
वांद्रे-वरळी सी-लिंक मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याचा पाठलाग; आरोपी तरुणाला थांबविण्यासाठी रंगला थरार
5
HDFC च्या कोट्यवधी ग्राहकांसाठी मोठी बातमी! Car आणि Home Loan च्या ग्राहकांवर होणार परिणाम
6
'त्या' ५ जागांबाबत राजनाथ सिंह आणि शरद पवारांमध्ये फोनवरून चर्चा; प्रकाश आंबेडकरांचा दावा
7
पवार वि. पवार वादाला मतदार कंटाळला; बारामतीत टक्का घसरला
8
आजचे राशीभविष्य - ८ मे २०२४; धन - मान - सन्मान मिळतील, सरकार कडून फायदा होईल
9
ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजप सरकार कोसळणार? हरयाणामध्ये तीन अपक्ष आमदारांनी काढला पाठिंबा
10
तीन ईव्हीएम जाळण्याचा प्रयत्न; तरुणावर गुन्हा दाखल; सोलापूर जिल्ह्यातील बागलवाडी येथील बूथवरील प्रकार
11
‘सेक्स स्कँडल’च्या २५,००० पेन ड्राइव्हचे पोलिसांनीच वाटप केले; कुमारस्वामी यांचा आरोप, मोदीही प्रथमच बोलले
12
अरविंद केजरीवाल यांना जामीन देण्यास सुप्रीम कोर्ट अनुकूल; पण...
13
'तुला सहानंतर कोण आहे? बारामतीचा कोण येत नाही'; आमदार दत्ता भरणेंची शरद पवार गटाच्या कार्यकर्त्याला शिवीगाळ
14
मतदानाच्या दिवशी बारामतीत नात्यांचा ट्विस्ट, सुप्रिया सुळेंनी घेतली अजित पवारांच्या आईची भेट; तर अजित पवार म्हणाले... मेरी माँ मेरे साथ है!
15
‘मुस्लीम आरक्षण’ नवा मुद्दा; प्रचारात होतोय वारंवार उल्लेख, मोदींच्या जाळ्यात विरोधक अडकले
16
१० लाख इनाम असलेल्या बासित दारसह ४ अतिरेकी चकमकीत ठार
17
४ जून ‘इंडिया आघाडी’ची एक्स्पायरी डेट : पंतप्रधान मोदी 
18
घराण्याचा वारसा जिंकणार की नव्या चेहऱ्याला कौल मिळणार? विखे-लंके लढत : महसूलमंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला
19
‘बंगाली प्राइड’वर अन् विकास-अराजकतेमध्ये संघर्ष; दक्षिण बंगालच्या जागांवर तृणमूलची मदार
20
डाॅक्टरांच्या मनाईनंतरही धोनी खेळतोय आयपीएल; याच्या मांसपेशी फाटल्या

न्याहली गावात सर्वच प्रमुखपदांवर महिलांची नियुक्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2018 12:47 PM

न्याहली : सरपंच ते जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापिकेर्पयत सर्वच प्रमुख पदांवर महिलांची नियुक्ती झाल्याने न्याहली ता़ नंदुरबार येथे महिलाराज ...

न्याहली : सरपंच ते जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापिकेर्पयत सर्वच प्रमुख पदांवर महिलांची नियुक्ती झाल्याने न्याहली ता़ नंदुरबार येथे महिलाराज सुरु आह़े गावात पोलीस पाटीलपदी महिलेची नियुक्ती झाल्याने हे वतरुळ पूर्ण झाले होत़े संपूर्ण महिलाप्रमुखांच्या उपस्थितीत येथे गुरुवारी ग्रामसभा घेण्यात आली़ यावेळी महिलांनी ग्रामस्थांसाठी विविध विषयांवर चर्चा करत विकास घडवण्यासाठी बाध्य असल्याचे सांगितल़ेन्याहली येथे नुकतेच पोलीस पाटीलपदी प्रतिभा संदीप माळी यांची नियुक्ती करण्यात आली आह़े तत्पूर्वी गावात सरपंचपदावर शालिनी सदानंद पाटील, ग्रामसेविका एस़एस़चव्हाण, तलाठी अमिता साबळे, पंचशिल माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका शालिनी पाटील, आरोग्य सेविका केदार तर जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापिका पदावर कविता चत्रेकर ह्या काम पाहत आहेत़ एखाद्या गावात सर्वच प्रमुख पदांवर महिला कार्यरत असल्याचे हे जिल्ह्यात एकमेव उदाहरण असल्याची माहिती आह़े गुरुवारी सर्व महिला प्रमुखांच्या उपस्थितीत झालेल्या ग्रामसभेस माजी सरपंच सदानंद पाटील, जयराम माळी, पंढरीनाथ माळी, अशोक पाटील, शांतीलाल मिस्तरी, रविंद्र माळी, संदीप माळी, चतुर माळी, पितांबर माळी, मुरलीधर मिस्तरी, दौलत थोरात, संतोष माळी, प्रमोद माळी, भाऊसाहेब माळी, भरत माळी, सुभद्रा माळी, कमलबाई माळी, विजया माळी, मिराबाई माळी, रेखा माळी, हिराबाई माळी, जसोदा माळी आदी उपस्थित होत़ेसभेत गावासाठी मंजूर करण्यात आलेल्या तात्पुरत्या पाणी पुरवठा योजनेला महिनाभरात कार्यान्वित करणे, जीआयडीपी आरखडा तयार करणे, प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत ड यादीतील 125 लाभार्थीची माहिती आवास अॅपमध्ये भरणे, रोहयो कामांची मागणी करण्याचा ठराव करण्यात येऊन  स्वयंसहाय्यता बचत गटांचा आढावा घेण्यात आला़ सभेत तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी पंढरीनाथ माळी यांची फेरनिवड करण्यात आली़ रोजगार सेवक पदावर जगन्नाथ माळी यांची निवड करण्यात आली़ मुख्याध्यापिका कविता चत्रेकर यांनी गोवर- रुबेला लसीकरणाबाबत माहिती दिली़ आभार ग्रामसेविका  चव्हाण यांनी मानल़े