आदिवासींच्या आरक्षणाला धक्का लागू देणार नाही : नरेंद्र मोदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2019 09:30 PM2019-04-22T21:30:01+5:302019-04-22T21:32:35+5:30

चहावाल्याने कडक सरकार दिल्याचा दावा

Will not impose tribal reservation: Narendra Modi | आदिवासींच्या आरक्षणाला धक्का लागू देणार नाही : नरेंद्र मोदी

आदिवासींच्या आरक्षणाला धक्का लागू देणार नाही : नरेंद्र मोदी

Next


नंदुरबार : मोदी सरकार आदिवासींचे आरक्षण काढून घेणार असल्याची अफवा पसरविली जात आहे. मात्र जोपर्यंत आपण आहोत, तोपर्यंत आदिवासींच्या आरक्षणावर व जमिनीवर कुणीही हात लावू शकणार नाही असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी दुपारी नंदुरबार येथे झालेल्या सभेत दिला.
नंदुरबार व धुळ्याचे भाजपचे उमेदवार डॉ.हीना गावीत आणि डॉ.सुभाष भामरे यांच्या प्रचारासाठी सोमवारी येथील धुळे रस्त्यावरील मैदानावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा झाली. या वेळी बोलताना नरेंद्र मोदी यांनी सांगितले की, नव्या भारताच्या उभारणीसाठी भाजपने गेल्या पाच वर्षात अनेक विकास योजना राबवल्या आणि लोकांपर्यंत प्रत्यक्ष पोहोचवल्या.
काँग्रेस सरकारच्या राजवटीत कर्जमाफी दिली गेली पण ज्यांच्यासाठी ती दिली गेली त्या आदिवासींपर्यंत ती पोहोचली नाही. केवळ धनधांडग्यांसाठीच ती योजना होती. कारण आदिवासींचे बँकेत खातेच नव्हते. त्यामुळे त्यांना कर्ज मिळाले नव्हते. पण भाजप सरकार सत्तेवर येताच आदिवासींचे खाते उघडवले आणि थेट लाभ त्यांच्या खात्यात पोहोचवला.
‘आधार’ची योजना काँग्रेसने नंदुरबारपासून सुरू केली आणि ती योजना बंद व्हावी म्हणून सर्वोच्च न्यायालयात त्यांनीच दावा दाखल केला. लोकांची फसवेगिरी करण्याचे काम काँग्रेस व राष्टÑवादी काँग्रेसचे नेते करीत होते असा आरोप त्यांनी केला.
देशात पुन्हा भाजपचे सरकार आल्यास पंतप्रधान कृषी सन्मान योजनेसाठी शेतकऱ्यांसाठी असलेली पाच एकरची अट काढून ती सर्व शेतकऱ्यांना त्याचा लाभ देण्याची घोषणा त्यांनी यावेळी केली. दरम्यान, नंदुरबारच्या चहाचा संदर्भ देत एक चहावाल्यानेही गेल्या पाच वर्षात कडक सरकार दिल्याचा दावाही त्यांनी केला.
आदिवासींच्या वनउपजाला योग्य भाव देऊन आदिवासी शेतकºयांना समृद्ध करण्याचा, कुपोषण, सिकलसेल व आरोग्याबाबत व्यापक योजना राबविण्याचा प्रयत्न आगामी काळात राहणार असल्याचे सांगून भाजपचे सरकार आल्यास यापुढे आदिवासी शेतकºयांना बांबूच्या शेतीसाठी परवानगी देण्याचा निर्णय तसेच या शेतकºयांसाठी पेन्शन योजना राबविण्याचा निर्णय घेण्यात येणार असल्याची घोषणा त्यांनी केली. या वेळी त्यांनी काँग्रेसच्या काळातील धोरणात्मक निर्णयावर आरोप करीत त्यांनी जनतेची दिशाभूल व फसवणूक केल्याचा आरोपही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला.

Web Title: Will not impose tribal reservation: Narendra Modi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.