शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने सियालकोटवर हल्ला चढवला, अन् पाकिस्तानने अमृतसरवर; रात्रभर अफवांचा बाजार उठला...
2
पाकिस्तानला घरात घुसून मारले! १०० हून अधिक दहशतवादी ठार; पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला
3
Operation Sindoor Live Updates: स्फोटाचा आवाजांमुळे अमृतसरमध्ये रात्रभर ब्लॅक आऊट; पोलिस म्हणतात काहीच सापडले नाही
4
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
5
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडले ‘सिंदूर’ नाव; दडले आहेत कोणते पाच अर्थ? 
6
भारताच्या हल्ल्याला प्रत्युत्तरासाठी पाकची लष्कराला परवानगी
7
अर्ध्या तासात दहशतवादी भुईसपाट; ९ तळ उद्ध्वस्त; लष्करातील नारीशक्तीचे जगाला दर्शन
8
संपादकीय: याद राखा, हिशेब चुकता होईल! पाकिस्तान काय करेल आणि काय नाही...
9
पाकला धडा शिकवलाच, कायदेही मोडले नाहीत! एलओसी पार न करताच शत्रूवर मारा... 
10
सिंदूर, सोफिया अन् व्योमिका... नावात काय नाही, नावातच सारे दडलेले होते...
11
पाकिस्तान प्रतिहल्ला करेल?-शक्यता नाकारता येत नाही!
12
प्रवाशांना ‘बेस्ट’ची रिअल-टाइम सुविधा; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन 
13
१८ विमानतळांवरील कामकाज तात्पुरते बंद; एकट्या इंडिगोने सुमारे १६० उड्डाणे रद्द केली
14
सीमावर्ती जिल्ह्यांमधील १४ जिल्ह्यांत सर्व शाळा बंद; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पंजाब, राजस्थान आणि जम्मूत सूचना जारी  
15
विनाअपघात एसटी बस चालकांना बक्षीस देणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती
16
चंद्रावर उमटणार भारतीय अंतराळवीराचे पदचिन्ह
17
राज्यात गारपिटीची, तर मुंबईत मुसळधारेची शक्यता; मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याला इशारा
18
रोहितने ‘तो’ निर्णय तेव्हाच घेतलेला? गंभीर आलेला, पण रोहित शर्मा अनुपस्थित होता... 
19
रोहित शर्माने घेतली कसोटीतून तडकाफडकी निवृत्ती; इंग्लंड दौऱ्यात मिळणार होता डच्चू...
20
गोष्ट मिठी नदीच्या न उपसलेल्या गाळाची..., गाळाने भरले भ्रष्ट अभियंत्याचे खिसे; चौकशीतून स्पष्ट 

अखेरचा श्वास घेतानाही अतिरेक्याच्या डोक्यात 36 गोळ्या घातल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2017 17:48 IST

शहीद मिलिंद खैरनार यांची शौर्यकथा : पत्नी हर्षदा खैरनार यांची पतीला देशस्तरावर सन्मान मिळण्याची अपेक्षा

ठळक मुद्देदेश प्रथम, कुटुंब नंतर.. शहीद मिलिंद खैरनार यांच्यासाठी देश प्रथम आणि कुटुंब नंतर अशी भावना होती. यासंदर्भात त्यांच्या पत्नी हर्षदा खैरनार यांनी सांगितले, लगAाच्या पहिल्याच दिवशी त्यांनी आपल्याला हे सांगितले होते. 15 वर्षाच्या काळात सुटीच्यावेळी घरात ते जदेशसेवेसाठी काही करायचे आहे.. माङया पतीने देशासाठी बलिदान दिले हे आपल्यासाठी देशसेवेची प्रेरणा आहे. मी एम.एस्सी., आय.टी.ची पदवी घेतली आहे. त्यामुळे शासनाने मला महाराष्ट्रात शासकीय सेवेत काम करण्याची संधी दिल्यास निश्चितच आपणही काही करून दाखवू, अशी प्रतिक्

रमाकांत पाटील । लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : ‘छातीत आणि पाठीवर दुष्मनाच्या गोळ्या शिरल्या असतानाही रक्तबंबाळ अवस्थेत अखेरचा श्वास घेतानाही आपल्या पतीने अतिरेक्याच्या डोक्यात 36 गोळ्या घातल्या आणि त्याचा खात्मा केला. देशाच्या रक्षणासाठी पतीने दिलेली प्राणाची आहुती देशाच्या स्मरणात रहावी व त्यांना सन्मान मिळावा..’ शहीद मिलिंद खैरनार यांची प}ी हर्षदा खैरनार यांना आपल्या पतीची शौर्यकथा सांगताना अक्षरश: गहिवरले.बोराळे, ता.नंदुरबार येथील मिलिंद खैरनार या हवाई दलाच्या गरुड पथकातील कमांडोला नुकतेच काश्मिरमधील बंदीपुरा येथे अतिरेक्यांशी लढताना वीरमरण आले. दोन दिवसांपूर्वीच त्यांच्या पार्थिवावर बोराळे येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार झाले. या घटनेने संपूर्ण जिल्ह्यात शहीद मिलिंद खैरनार यांच्या शौर्यकथेची चर्चा आहे. यासंदर्भात त्यांच्या पत्नी हर्षदा खैरनार यांनी ‘लोकमत’शी बोलताना पतीच्या शौर्याबरोबरच आपली व्यथा आणि वेदनाही मांडली. त्या म्हणाल्या, ‘लगA झाले त्याचदिवशी पतीने मला सांगितले होते, माङयासाठी देश प्रथम त्यानंतर तू.. लगAाला 15 वर्षे होऊनही आम्हाला या काळात कौटुंबीक कुठलाही कार्यक्रम आनंदात साजरा करता आला नाही. प्रत्येकवेळी कुठले ना कुठले ‘ऑपरेशन’ डय़ुटीवर ते असल्याने आम्हाला एकत्रीतपणे जास्तवेळा राहता आले नाही. 15 वर्षानंतर प्रथमच डिसेंबरमध्ये आम्ही सर्व कुटुंब माझा भाऊ डॉ.मनीष जगताप याच्या विवाहानिमित्त एकत्र येणार होतो. 4 डिसेंबर 2017 ला त्याचे लगA आहे. त्यासाठी त्यांना 10 दिवसांची सुटी मिळाली होती. हे 10 दिवस कुटुंबासोबत एक वेगळ्या आनंदात घालवण्याचे मी नियोजन केले होते. परंतु त्यापूर्वीच ही घटना घडली.आपल्या कौटुंबीक भावना व्यक्त करताना हर्षदा खैरनार यांचा कंठ दाटून आला होता. पण त्याचबरोबर पतीच्या शौर्याची कथा सांगताना मात्र त्यांच्या चेह:यावर जोश संचारला होता. त्या म्हणाल्या, पतीचा मृतदेह आणणा:या हवाई दलाच्या अधिका:यांनी त्या अंतिम क्षणाचे वर्णन सांगितले. ज्याठिकाणी आपले पती व त्यांचा साथीदार ‘ऑपरेशन’साठी गेले होते त्याठिकाणी दोनच अतिरेकी असल्याची त्यांना माहिती होती. मात्र प्रत्यक्षात तेथे सहा जण निघाले. मिलिंद यांनी थेट अतिरेक्याच्या समोर जाऊन लढाई लढली. त्यांच्यावर अतिरेक्यांनी ग्रेनाईटचे बॉम्ब फेकले, बंदुकीच्या गोळ्या झाडल्या, त्यांच्या डाव्या बाजूच्या हाताला, पाठीवर आणि छातीवर गोळ्या लागल्या होत्या. अतिशय रक्तबंबाळ अवस्थेतही त्यांनी दुष्मनावर 36 गोळ्या डोक्यात घातल्या व त्याचा खात्मा केला. मिलिंद यांनी यापूर्वीदेखील 26/11 च्या लढाईत अतिरेक्यांचा सामना केला होता. एका अतिरेक्याचा खात्माही केला होता. ग्रीनहंटच्या नक्षलवादी भागात जंगलात दोन महिने ते एकटे होते. त्यांनी देशासाठी महत्त्वाच्या असलेल्या सहा प्रमुख ‘ऑपरेशन’मध्ये महत्त्वाची भूमिका बजावली होती. छोटय़ा-मोठय़ा अनेक लढायांना ते सामोरे गेले होते. देश हा त्यांच्यासाठी सर्व काही होते. त्यामुळे आपल्या पतीच्या बलिदानावर आपल्याला गर्वही आहे. फक्त देशानेदेखील त्यांचा सन्मान करावा, ही अपेक्षा आहे.