पिंपर्डे शिवारात गव्हाला आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2021 04:29 IST2021-04-10T04:29:57+5:302021-04-10T04:29:57+5:30

शहादा तालुक्यातील पूर्व भागातील पिंपर्डे येथील अल्पभूधारक शेतकरी कांतीलाल पुंडलिक मराठे यांच्या दोन एकर शेतात गहू पिकाची ...

Wheat fire in Pimparde Shivara | पिंपर्डे शिवारात गव्हाला आग

पिंपर्डे शिवारात गव्हाला आग

शहादा तालुक्यातील पूर्व भागातील पिंपर्डे येथील अल्पभूधारक शेतकरी कांतीलाल पुंडलिक मराठे यांच्या दोन एकर शेतात गहू पिकाची कापणी करून गोळा करून गरी केली होती. त्यांच्या शेतातून विद्युत तारेचा प्रवाह गेला होता. रात्रीच्या सुमारास वीज तारांच्या शॉर्टसर्किटमुळे आगीची शेतात पडल्याने आग लागली आणि ती आग गव्हाच्या गरीपर्यंत जाऊन पोहोचली. आगीत गोळा करुन ठेवलेले गव्हाचे पीक पूर्णत: जळून खाक झाले. त्यामुळे या अल्पभूधारक शेतकऱ्याचे दोन एकरावरील गहू व चारा मिळून ५० हजारापेक्षा जास्त नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांनी कसेबसे दिवस-रात्र मेहनत करून पाणी देऊन व इतर मशागती करून पीक वाचवले होते. गव्हाला आग लागल्याने तोंडी आलेला घास हिरावून घेतल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. या शेतकऱ्याला शासनाकडून तातडीने आर्थिक मदत देण्यात यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

Web Title: Wheat fire in Pimparde Shivara