बंद पडलेल्या हातपंपांमुळे पाणीटंचाई

By admin | Published: March 27, 2017 12:14 AM2017-03-27T00:14:19+5:302017-03-27T00:14:19+5:30

अक्कलकुवा तालुक्यात समस्या : नाल्यातील झºयातील पाण्याचा आधार

Water shortage due to closed pumps | बंद पडलेल्या हातपंपांमुळे पाणीटंचाई

बंद पडलेल्या हातपंपांमुळे पाणीटंचाई

Next

वाण्याविहीर : सातपुड्याच्या दुर्गम भागातील वडफळी, कुकडीपादर व हुणाखांब या तीन ग्रामपंचायतीत समावेश असलेल्या पाड्यांवर पाणी टंचाई तीव्र झाली आहे़ या तीव्रतेत पाड्यांवर टाकलेले नादुरुस्त हातपंप  अधिक भर टाकत आहेत़ बंद पडलेल्या हातपपांमुळे चापडी येथे काही दिवसांपूर्वी आग लागल्यानंतर ती विझवण्यासाठी पाणीच न मिळाल्याने तीन घरे भस्मसात झाली होती़   
अक्कलकुवा तालुका प्रशासनाने याठिकाणी उपाययोजना करण्याची मागणी करण्यात येऊनही कारवाई करण्यात येत नसल्याने नाराजी व्यक्त करण्यात येत आहे़ गेल्या दोन महिन्यांपासून दुर्गम भागातून वाहणारे नदी व नाल्याचे पाणी आटल्याने नागरिकांची पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती सुरू झाली आहे़ चापडी गावासह पाड्यांवर ठिकठिकाणी नादुरुस्त झालेल्या हातपंपांची दुरुस्ती करून पाणीटंचाईतून सुटका करण्याची मागणी करूनही प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देत नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे़ 
अक्कलकुवा तालुक्याच्या दुर्गम भागातील कुकडीपादर, वडफळी व हुणाखांब या तीन ग्रामपंचायतअंतर्गत येणाºया गठाणीपाडा, म्हेलेंटेबापाडा, तुरवीराहीपाडा, वड पाडा, अरेठी, अरेठीचा तुरविहीपाडा, निंबीपाडा, बोरखापाडा, केवडी, गालीसिबाडीपाडा, बाराआंबापाडा, गामाईपाडा, देवचापडापाडा, रमणपाडा, केवडापाडा, सरपंचपाडा, चावडी, वावीपाडा, माथापाडा, एकलापाडा, वडफळी, होळीदेवपाडा, रुबजीपाडा, गोलापाडा, खाळपाडा, खमळपाडा, बगदा, जांबीपाडा, हनुमानमंदिर पाडा, पांढरामाती, पुंजारापाडा, महाराजपाडा, माजी सरपंचपाडा, मोरही, उमराईपाडा, मोरही गाव, मोवान, शेल्टीपाडा, काजीआंबापाडा, मोकस, सोगाआंबापाडा, पुवरापाडा, तडवीपाडा, हुणाखांब, खाटीआंबापाडा, डोंगºयापाडा, चनवाईपाडा, लोहारपाडा याठिकाणी पाणीटंचाई दिवसेंदिवस भीषण होत आहे़ नदी नाले पूर्णपणे कोरडे झाल्याने महिला पिण्याचे पाणी घेण्यासाठी दुर्गम व अतिदुर्गम भागात नाल्यांंमध्ये केलेल्या शेवड्या आणि झºयांमधून पाणी आणत आहेत़ हे झरे पुन्हा पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी वेळ लागत असल्याने उन्हातान्हात महिला त्याठिकाणी बसून रहात असल्याचे दिसून येत आहे़ यापूर्वीही गेल्या महिन्यात या गावांमध्ये निर्माण झालेल्या पाणीटंचाईवर मार्ग काढण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींनी निवेदन देऊनही कारवाई झालेली नाही़
पाणीटंचाईग्रस्त पाड्यांची संख्या वाढतच जाणार असल्याने             तालुका प्रशासनाने पाड्यांवर हातपंप दुरुस्तीचे पथक पाठवण्याची मागणी आहे़ यासोबत नव्याने हातपंपांची निर्मिती करण्यासाठी सर्वेक्षण यंत्रणा राबवण्याची गरज असल्याचे मत दुर्गम भागातील ग्रामस्थांनी व्यक्त केले आहे़

Web Title: Water shortage due to closed pumps

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.