शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
3
IPL 2025 Playoffs Race : आता MI सह ६ संघ शर्यतीत; कुणाचा पेपर सोपा कुणाला आहे सर्वाधिक धोका?
4
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
5
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
6
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
7
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
8
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
9
तू स्वप्नातही...! राहुल द्रविडचा हिटमॅन रोहितसाठी खास मेसेज; मुंबई इंडियन्सनं शेअर केला व्हिडिओ
10
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
11
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
12
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
13
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
14
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
15
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
16
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
17
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
18
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
19
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
20
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा

चारही पालिकांचा पाणी प्रश्न मिटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2020 12:06 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : नंदुरबारसह जिल्ह्यातील चारही पालिकांच्या पाणीपुरवठ्याचा प्रश्न मिटला आहे. या चारही शहरांना पाणी पुरवठा करणारे ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : नंदुरबारसह जिल्ह्यातील चारही पालिकांच्या पाणीपुरवठ्याचा प्रश्न मिटला आहे. या चारही शहरांना पाणी पुरवठा करणारे मध्यम प्रकल्प व बॅरेजेस पुर्णपणे भरले आहेत. गेल्यावर्षी देखील या शहरांचा पाणी पुरवठ्याचा प्रश्न मिटला होता. दरम्यान, नंदुरबार वगळता इतर तिन्ही शहरात दररोज एकवेळ पाणीपुरवठा केला जातो.जिल्ह्यात गेल्या वर्षी सरासरीपेक्षा अधीक पाऊस झाल्याने शहर व गावांचा पाणी प्रश्न मिटला होता. यंदा देखील पावसाने सरारसरी गाठली आहे. शिवाय लघु व मध्यम प्रकल्पांमध्ये समाधानकारक पाणीसाठा झाला आहे. जमिनीतील पाण्याची पातळी देखील चांगली आहे. त्यामुळे यंदा पाणी टंचाईची स्थिती फारशी गंभीर राहणार नाही अशी प्राथमिक स्थिती आहे.नंदुरबार : एक दिवसाआड...शहराची लोकसंख्या लक्षात घेता व पाणी साठवण्याची क्षमता पहात दररोज एक दिवसाआड पाऊण तास पाणीपुरवठा केला जातो. गेल्या १५ ते २० वर्षांपासून एक दिवसाआडच पाणी पुरवठा होतो. नंदुरबारात विस्तारीत पाणीपुरवठा योजना अंमलात आणली गेली असली तरी दररोज पाणी पुरवठा केला जाऊ शकत नाही हे स्पष्टच आहे.शहराला पाणी पुरवठा करणारे विरचक आणि आंबेबारा प्रकल्प यंदाच्या पावसाळ्यात क्षमतेनुसार भरले आहेत. आंबेबारा प्रकल्प जुलै महिन्यातच ओव्हरफ्लो झाला होता. तर विरचक प्रकल्पात आतापर्यंत ७६ टक्के पाणीसाठा झाला आहे. या प्रकल्पात सुरू असलेली पाण्याची आवक पहाता गेल्या वर्षाप्रमाणे यंदा देखील हा प्रकल्प पुर्णपण भरला जाणार आहे. या प्रकल्पातून शहरातील ७० टक्के भागाला पाणी पुरवठा केला जातो. तर आंबेबारा प्रकल्पातून ३० टक्के भागाला पाणी पुरवठा होतो. हे दोन्ही प्रकल्प भरल्याने शहरवासीयांची पाणी पुरवठ्याची चिंता मिटली आहे.गेल्यावर्षी देखील हे दोन्ही प्रकल्प आॅगस्ट महिन्यातच ओव्हरफ्लो झाले होते. त्यामुळे वर्षभर पाणी पुरवठ्याची चिंता मिटली होती. यंदा देखील तीच स्थिती आहे.शहादा शहराला दररोज एकवेळा पाणी पुरवठा केला जातो. शहादा पालिकेने सारंगखेडा बॅरेजमधून पाणी पुरवठा योजना सुरू केली तेंव्हापासून शहराला पाणी टंचाई जाणवत नसल्याचे चित्र आहे. पूर्वी शहराला गोमाई नदीतील जॅकवेलमधून पाणी पुरवठा केला जात होता.उन्हाळ्यात जॅकवेलच्या विहिरीचे पाणी आटल्यावर पाणी पुरवठ्याची समस्या निर्माण होत होती. चार ते पाच दिवसाआड पाणी पुरवठा करावा लागत होता. आता मात्र, तापीवरील पाणी पुरवठा योजनेमुळे दररोज पाणी ुपुरवठा होत आहे.तळोदा : एक दिवसाआडतळोदा शहराला तापी नदीतून पाणी पुरवठा योजनेची प्रतिक्षा आहे. ही योजना मार्गी लागली तर मोठी समस्या अर्थात पुढील ५० वर्षाच्या लोकसंख्येचा विचार करता प्रश्न कायमचा मिटणार आहे. शहरात सध्या एक जलकुंभ आहे. त्यद्वारे तसेच ३१ कुपनलिकाद्वारे देखील पाणी पुरवठा केला जातो. आता मात्र शहराचा वाढता विस्तार आणि वाढती लोकसंख्या लक्षात घेता तापी योजना आकरास आणली गेली तर मोठा प्रश्न सुटणार आहे. १८ कोटी रुपयांची ही प्रस्तावीत योजना गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबीत आहे. ती मार्गी लागावी यासाठी शासन, प्रशासन स्तरावर पाठपुरावा सुरू आहे.नवापूर : रंगावलीचा आधारशहराला रंगावली प्रकल्पातून पाणी पुरवठा केला जातो. मध्यम प्रकल्प म्हणून रंगावलीची नोंद आहे. दरवर्षी हा प्रकल्प ७० टक्केपेक्षा अधीक भरतो. तीन वर्षांपूर्वी विविध संस्था आणि लोकसहभागातून या प्रकल्पातील गाळ काढण्यात आला होता. तेव्हापासून प्रकल्पातील पाणीसाठवण क्षमता देखील वाढली आहे. शहरात पाणी पुरवठ्याची समस्या नसल्याचे पालिकेन स्पष्ट केले आहे.नंदुरबारची लोकसंख्या जवळपास एक लाख ४० हजारघरगुती व व्यावसायिक नळ जोडणीधारकांची संख्या १२,५०० पेक्षा अधीकदररोज होणारा पाणी पुरवठा जवळपास ८० लाख लिटरदररोज एक दिवसाआड आणि किमान ४५ मिनिटे पाणीपुरवठा१५ जलकुंभातून झोननुसार पुरेशा दाबाने पाणीपुरठ्याची सोयपाण्याची नासाडी थांबविण्यासाठी सेवाभावी संस्थेतर्फे नळांना मोफत तोट्या वाटपवेळेवर आणि नियमित पाणी पुरवठा होत असल्यामुळे शहरवासीयांकडून पाण्याची प्रचंड नासाडीशहरात जवळपास १२९ किलोमिटरची पाईपलाईन टाकण्यात आली आहे. आठ झोन तयार करण्यात आले आहेत. शहराच्या चारही बाजूंनी जलकुंभ करण्यात आलेले आहेत. त्यात साक्रीनाका, वाघेश्वरी टेकडी येथील जलकुंभातील पाणी हे तीव्र उतारामुळे पुरेशा प्रमाणात त्या त्या भागात पोहचते. नवीन जलकुंभ करण्यात आलेल्या भागात देखील दोन ते तीन वसाहती मिळून झोन तयार करण्यात आल्यामुळे पाणीपुरवठा पुरेशा प्रमाणात होतो.