शहरं
Join us  
Trending Stories
1
'देश वाचवण्यासाठी मी पुन्हा तुरुंगात जातोय; Exit Poll वर विश्वास ठेवू नका'- अरविंद केजरीवाल
2
"निवडणुकीआधी उद्धव ठाकरेंनी मोदींकडे भेटीची वेळ मागितली होती", शिंदे गटातील नेत्याचा मोठा गौप्यस्फोट
3
११ हजार कोटींच्या संपत्तीवरून वाद... आईने भावाला मारहाण केल्याचा ललित मोदींचा आरोप
4
आज ठाकरेंना नऊ जागा दाखवत असतील...; अजित पवार गटाला शून्य जागेवरून राष्ट्रवादीच्या मंत्र्याचा मोठा दावा
5
"निकालानंतर २० दिवसातच उद्धव ठाकरे मोदींसोबत..."; आमदार रवी राणांचा मोठा गौप्यस्फोट
6
इलेक्शन ड्युटीवरील कर्मचाऱ्यांसाठी काळ बनला सूर्य; 58 जणांचा मृत्यू, सर्वाधिक 'या' राज्यात...
7
"ज्या शाळेत शिकलात ती काँग्रेसने बांधलीय"; नाना पटोलेंचा संजय राऊतांचा खोचक टोला
8
४ जूनपूर्वीच भाजपाला खूशखबर, अरुणाचल प्रदेशमध्ये मिळवला दणदणीत विजय
9
NDA आणि INDIAच्या लढतीत ही पाच राज्यं ठरली निर्णायक, बिघडवला ‘इंडिया’चा खेळ
10
रवीना टंडनची काहीही चूक नाही? ती नशेत नव्हती? CCTV फूटेजमुळे समोर आली वेगळीच कहाणी
11
"अमित शाह जिल्हाधिकाऱ्यांना फोन करून धमकावत आहेत"; काँग्रेसच्या आरोपाची निवडणूक आयोगाकडून दखल
12
पॅरिसवरुन मुंबईला येणाऱ्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 306 प्रवाशांचा जीव टांगणीला
13
"निवडणुकीसाठी मी तयार नव्हतो पण..."; चंद्रपूरच्या एक्झिट पोलनंतर मुनगंटीवारांचे सूचक विधान
14
अमेरिका पुन्हा हादरली! बर्थडे पार्टीत अंदाधुंद गोळीबार; २७ जणांना लागल्या गोळ्या, एकाचा मृत्यू
15
इंडिया आघाडी किती जागा जिंकणार? राहुल गांधी म्हणाले, "सिद्धू मुसेवालाचे गाणे ऐका, कळेल.."
16
मनोज तिवारी आणि कन्हैया कुमार यांच्यात कोण जिंकणार?; एक्झिट पोलने सांगितला आकडा
17
दिग्गज फुटबॉलपटू बायचुंग भुतिय यांना 'रेड कार्ड', राजकीय मैदानात मतदारांनी पुन्हा नाकारले...
18
'माझे एज आहे 17, रस्त्यावर लोकांना खतरा' पोर्शे कार अपघातावर आरजे मलिष्काचं नवं रॅप साँग ऐकलंत का?
19
एक्झिट पोलमध्ये भाजपला प्रचंड बहुमत; प्रशांत किशोर यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा अरुणाचल प्रदेशमध्ये डंका; दोन्ही राज्यातील विधानसभा निवडणुकीत 'हे' पक्ष आघाडीवर

संस्थेच्या पुढाकारातून वाया जाणारे पाणी अडविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 04, 2019 12:27 PM

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : तालुक्यातील लोंढरे गावालगत असलेले धरण पूर्ण भरले असून या धरणाच्या सांडव्यातून वाहणा:या पाण्याचा शेतक:यांना ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : तालुक्यातील लोंढरे गावालगत असलेले धरण पूर्ण भरले असून या धरणाच्या सांडव्यातून वाहणा:या पाण्याचा शेतक:यांना योग्य उपयोग व्हावा यासाठी गंगोत्री फाऊंडेशनने पुढाकार घेतला आहे. फाऊंडेशनतर्फे पोकलेन मशीनद्वारे पाटचा:या व नाल्यांचे खोलीकरण करण्यात येत आहे. त्यामुळे परिसरातील जमिनीतील पाणी पातळीत वाढ होऊन विहिरी व कुपनलिकांनाही त्याचा फायदा होणार आहे.शहादा तालुक्यात 15 दिवसांपूर्वी पावसाने दमदार हजेरी लावल्याने नदी-नाले प्रवाहीत झाले आहेत. तालुक्यातील लोंढरे गावाजवळील धरणही ओव्हरफ्लो झाले असून सांडव्यातून पाणी वाहत आहे. वाहून जाणा:या पाण्याचा योग्य विनीयोग व्हावा यासाठी शहादा येथील गंगोत्री फाऊंडेशनचे अध्यक्ष व जि.प. सदस्य अभिजित पाटील यांनी पोकलेन मशीनद्वारे पाटचा:या व नाल्यांचे खोलीकरणाचे काम सुरू केले आहे. या धरणाच्या परिसरातील शेतक:यांनी जि.प. सदस्य अभिजित पाटील यांची भेट घेऊन धरणातील पाण्याच्या नियोजनाबाबत चर्चा केली. अभिजित पाटील यांनी गंगोत्री फाऊंडेशनच्या वतीने  पोकलेन मशीनद्वारे पाटचारी व नाले खोलीकरणाचे काम सुरू केले आहे. तालुक्यातील जयनगर, कवठळ, वरुळ कानडी व परिसरातील शेतक:यांना पाण्याचा उपयोग होणार आहे. या धरणाच्या पाटचारीद्वारे वाहून जाणारे पाणी कहाटूळ गावाकडे नेण्यात येणार आहे. पाटचा:या व नाले प्रवाहीत होऊन अनेक वर्षापासून बंद पडलेल्या कुपनलिकांनाही पाणी येणार आहे. महात्मा ज्योतीबा फुले युवा मंचचे संस्थापक अध्यक्ष ईश्वर माळी, सरपंच राहुल पाटील, हिंमतराव रोकडे, शहाजी देसले, सुरेश गिरासे, विजय पाटील, निळकंठ सिसोदे, महेंद्र देसले, अमोल सनेर, देविदास नेरपगार, किरण पाटील, पंकज नेरपगार, नीलेश सनेर, लोंढरे, जयनगर, धांद्रे परिसरातील शेतक:यांनी गंगोत्री फाऊंडेनच्या उपक्रमाचे कौतुक केले. धरणातील पाणी कमी झाल्यावर गाळ काढण्यासाठीही फाऊंडेशनतर्फे सहकार्य केले जाईल, असे जि.प. सदस्य अभिजित पाटील यांनी या वेळी सांगितले.