लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : राष्ट्रीय महामार्गासाठी जमिन अधिग्रहित करुनही शेतकऱ्यांना मोबदला दिल्याने तसेच रस्ता कामामुळे शेतात पाणी जावून पिकांचे नुकसान झाले आहे़ यामुळे जमिनीचा मोबदला आणि शेतातील पिकांच्या नुकसानीची भरपाई देण्याची मागणी करजई आणि डामरखेडा येथील शेतकऱ्यांनी केली आहे़ शेतकºयांनी शहादा तहसीलदार यांना याबाबत निवेदन दिले आहे़तहसीलदार मिलींद कुलकर्णी यांची भेट घेत शेतकºयांनी हे निवेदन दिले़ निवेदनात, राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू करताना कोणत्याही प्रकारे शेतकºयांना विश्वासात घेतले नाही़ शेतकºयांच्या जमिनी हडप केल्या, शेतकºयांना तात्काळ मोबदला दिला जाईल असे जाहिर आश्वासन देण्यात आले होते़ दोन वर्षांपासून मात्र आश्वासनाची पूर्तता करण्यात आलेली नाही़ रस्ता कामामुळे पिकांचे मोठे नुकसान होत आहे़ अधिकाºयांनी शेतकºयांच्या जमिनी मोजून कोणत्याही प्रकारचा अहवाल शासनाला दिलेला नसल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे़ भूमापन अधिकारी किंवा महाराष्ट्र राज्य रस्ते विकास विभागातील अधिकाºयांनी याकडे दुर्लक्ष केले आहे़ ज्या शेतकºयांच्या जमिनी महामार्गात गेल्या आहेत़ ते देशोधडीला लागले आहेत़ यामुळे सात दिवसांच्या आत चौकशी करुन न्याय न मिळाल्यास १५ आॅगस्टपासून न्याय मिळेपर्यंत वेगवेगळ्या प्रकारे आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे़हे निवेदन प्रांताधिकारी व पोलीस निरीक्षक यांनाही देण्यात आले आहे़ प्रसंगी डामरखेडा, करजई आणि बुपकरी येथील पुरुषोत्तम पाटील, वासुदेव पाटील, जगन्नाथ पाटील, भीमा बुला पाटील, मोहन रामजी पाटील, यशवंत पाटील ,अरुण श्रीकृष्ण पाटील, मुकुंद मधुकर पाटील, भटू पाटील, छोटूलाल पाटील, नरसई पाटील, देवदास पाटील, भगवान पाटील, रविंद्र पाटील, हरी पाटील, गोपाळ पाटील, रामदास पाटील आदी उपस्थित होते़विसरवाडी ते सेंधवा या राष्ट्रीय महामार्गाच्या कामाला तीन वर्षांपासून सुरूवात झाली आहे़ ८० टक्के काम पूर्ण झाले आहे़ दरम्यान करजई, बुपकरी, डामरखेडा आणि प्रकाशा शिवारालगत शेतजमिनी ठेकेदाराने शेतकºयांना विश्वासात न घेत बळकावल्या आहेत़ शेतकºयांची बाजू ऐकून न घेता शेतातून रस्ता तयार केला आहे़ याचा मोबदला शेतकºयांना अद्याप मिळालेला नाही़ शेतीपिकांच्या नुकसानीचीही रक्कम देण्यात आलेली नाही़ भूमी अधिग्रहण मोजमाप करून रेडी रेकनर नुसार व्याजासहीत वाढीव पाच टक्के रक्कम शेतकºयांना देण्याची मागणी करण्यात आली आहे़ निवेदनाद्वारे शेतकºयांनी जेलभरो, रास्ता रोको आणि आत्मदहनाचा इशारा दिला आहे़
जमिनीचा मोबदला न मिळाल्यास आंदोलनाचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2020 12:55 IST