बसच्या मागणीसाठी भिंतीवरच साकारली बस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2020 12:07 PM2020-02-18T12:07:35+5:302020-02-18T12:07:40+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क रायखेड : विद्यार्थ्यांसह नागरिकांच्या सुविधेसाठी शहादा आगाराकठे बससेवा सुरु करण्याची मागणी करण्यात आलली. मात्र ही मागणी ...

On the wall for the demand of the bus | बसच्या मागणीसाठी भिंतीवरच साकारली बस

बसच्या मागणीसाठी भिंतीवरच साकारली बस

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
रायखेड : विद्यार्थ्यांसह नागरिकांच्या सुविधेसाठी शहादा आगाराकठे बससेवा सुरु करण्याची मागणी करण्यात आलली. मात्र ही मागणी वेळोवेळी पाठपुरावा करुनही बेदखल राहिली. या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी कलमाडी त.ह. ता. शहादा येथील जिल्हा परिषद शाळेच्या भिंतीवरच बस साकरण्यात आली आहे.
सर्वत्र डिजीटल इंडियाची वारे वाहत असले तरी कलमाडी तह.ह. ता. शहादा या गावात अद्याप बस पोहोचली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांसह सर्व नागरिकांना अनेक समस्यांना समोरे जावे लागत आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान देखील होत आहे. नागरिकांच्या समस्या सुटत विद्यार्थ्यांचेही नुकसान टळावे, यासाठी अनेक वर्षांपासून परिवहन महामंडळाकडे बससेवा सुरू करण्याची मागणी करण्यात आली. याबाबत शहादा आगाराकडे वेळोवेळी पाठपुरावाही करण्यात आला. मात्र कलमाडीकरांची ही मागणी आजच्या आधुनिकतेतही बेदखल राहिली. त्यामुळे विद्यार्थ्यांना पाच किलोमिटर पायपीट करावी लागत आहे.
मागणीची दखल घेतली जात नसल्याने हताश झालेल्या विद्यार्थी, शिक्षक व ग्रामस्थांनी त्यांच्या रास्त मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी तेथील जिल्हा परिषद शाळेच्या भिंतीवरच बसगाडीचे चित्र रेखाटले आहे. यातून ॅॅविद्यार्थी व नागरिकांच्या मागणीची दखल घेतली जाईल अन् तेथील ग्रामस्थांसह विद्यार्थ्यांचीही पाच किलोमिटरची होणारी पायपीट थांबण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. याबाबत शहादा आगार प्रशासन कुठली भूमिका घेते याकडे लक्ष लागून आहे.

Web Title: On the wall for the demand of the bus

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.