पोलीस मदत केंद्रच मदतीच्या प्रतिक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2020 12:06 PM2020-03-24T12:06:33+5:302020-03-24T12:06:40+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : प्रवासी व वाहतुकीच्या सुरक्षेसाठी दावळघाट परिसरातील सिसलाबारी ता. धडगाव येथे पोलीस मदत केंद्र तयार ...

Waiting for help at the police help center | पोलीस मदत केंद्रच मदतीच्या प्रतिक्षेत

पोलीस मदत केंद्रच मदतीच्या प्रतिक्षेत

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : प्रवासी व वाहतुकीच्या सुरक्षेसाठी दावळघाट परिसरातील सिसलाबारी ता. धडगाव येथे पोलीस मदत केंद्र तयार करण्यात आले. परंतु या केंद्राची दुरवस्था झाल्यामुळे प्रवासी व वाहतुकीला धोका निर्माण झाला आहे.
म्हसावद ता. शहादा पोलीस ठाण्यांर्गत शहादा ते धडगाव रस्त्यावरील घाट परिसरात रात्री-अपरात्री व दिवसाही होणारी लूटमार, अपघात व अन्य अनुचित घटना घडतात. या पार्श्वभूमीवर प्रवासी व वाहनधारकांच्या मदतीसाठी पोलीस चौकी बांधण्यात आली. तेथे म्हसावद व धडगाव पोलीसांकडून नियंत्रण ठेवण्यात येत आहे. शिवाय या घाट परिसरात कार्यरत पोलीसांना देखील ही चौकी आधारभूत ठरते. परंतु या चौकीच्या खिडक्या, दरवाजे, छताचे पत्रे मागील दोन वर्षांपासून गायब झाले आहे.
अन्य चोरीसाठी येणाऱ्या चोरांनी पोलीस चौकीवरच डल्ला मारल्याने सामान्य जनतेचे काय? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. या मार्गावरु प्रवास करणाºया सामान्य नागरिक व वाहनधकांच्या सुरक्षेसाठी पुन्हा या पोलीस चौकीची दुरुस्तीसाठी काम हाती घेण्यात यावे अशी मागणी करण्यात येत आहे.

Web Title: Waiting for help at the police help center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.