महाराष्ट्र-मध्यप्रदेश सिमेवरील गावांमध्ये ‘लॉकडाऊनला प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2020 01:07 PM2020-03-27T13:07:07+5:302020-03-27T13:08:26+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क खेतिया : कोरोनाचा संसर्ग थोपवण्यासाठी लॉकडाऊन करण्यात आले आहे़ या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र-मध्यप्रदेश सिमेवरील खेतिया आणि खेडदिगर ...

Villages on the Maharashtra-Madhya Pradesh border respond to 'lockdown | महाराष्ट्र-मध्यप्रदेश सिमेवरील गावांमध्ये ‘लॉकडाऊनला प्रतिसाद

महाराष्ट्र-मध्यप्रदेश सिमेवरील गावांमध्ये ‘लॉकडाऊनला प्रतिसाद

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
खेतिया : कोरोनाचा संसर्ग थोपवण्यासाठी लॉकडाऊन करण्यात आले आहे़ या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र-मध्यप्रदेश सिमेवरील खेतिया आणि खेडदिगर या दोन्ही गावांमधील नागरिक घरीच राहणे पसंत करत असल्याने ऐरवी असणारा सीमावर्ती भागात शुकशुकाट पसरला आहे़
गुरुवारी सकाळपासून खेतिया शहरात विनाकारण फिरणाऱ्यांना पोलीसांनी चांगलेच धारेवर धरत त्यांच्यावर कारवाई केली़ जागोजागी घोळका करुन बसणारे तसेच पोलीसांना हुलकावणी देत पळ काढणाऱ्यांवर कारवाई करत त्यांना लाठी मार दिला़ यात पोलीसांनी नियम मोडणाºयांच्या हाती ‘मी ह्या देशाचा व समाजाचा दुश्मन असून मी घरी बसणार नाही’ असे पोस्टर देत त्यांच्याकडून उठबशा काढून घेत शिक्षा केली़ शहरात अनेक ठिकाणी व रस्त्यावर नागरिक मोटरसाइकल ने फिरतांना आढळून आल्यानंतर पोलिस निरीक्षक राजेंद्र इंगळे यांच्यासह पोलीस कर्मचाºयांनी ही कारवाई केली़ दरम्यान खेतिया येथील बँकांमध्ये विविध सूचना करण्यात येत असून एकावेळी एकास ग्राहकाला आतील भागात प्रवेश दिला जात आहे़
खेतिया शहरात सकाळी आठ ते दहा वाजेपर्यंत किराणा दुकाने, भाजीपाला विक्रेत, दुध यांची विक्री करण्यात येत आहे़ नागरिकांनी एकमेकांपासून अंतर ठेवून उभे राहावे व मास्क सैनिटाइजर चा वापर करावा असे पालिका प्रशासनाने कळवले आहे़ प्रांताधिकारी सुमेरसिंह मुजाल्दे, तहसीलदार राकेश सत्या हे सतत दौरे करीत असून त्यांना सूचना देत आहेत.
खेतिया शहरात करण्यात येणाºया उपाययोजनांबाबत माहिती देताना मुख्य कार्यकारी अधिकारी ईश्वर महाले यांनी सांगितले की, शहरात दररोज औषधांची फवारणी करण्यात येत असून साफ सफाई करण्यात येत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील अनेक सेवाभावी नागरिकांची मदत करत आहेत़

महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश सिमेवरील खेतिया आणि खेडदिगर या दोन्ही गावांच्या हद्दीत महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश पोलीस प्रशासनाचे पथक, आरोग्य विभागाचे पथक, नगरपालिका, ग्रामपंचात कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे़ सिमा ओलांडू पाहणाºयांना त्यांच्याकडून अटकाव करण्यात येत आहे़ दोन्ही राज्यात संचारबंदी असल्याने या सिमा सील करण्यात आल्या आहेत़ दरम्यान दोन्ही गावांमध्ये बाहेरगावाहून येणाºयांना आधी तपासणीसाठी प्राथमिक आरोग्य केंद्र आणि रुग्णालयात पाठवण्यात येत आहे़ याठिकाणी तपासणी पूर्ण करण्यात आल्यानंतर बाहेर सोडण्यात येत आहे़

Web Title: Villages on the Maharashtra-Madhya Pradesh border respond to 'lockdown

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.