शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
2
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
3
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
4
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
5
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
6
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
7
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
8
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
9
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
10
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
11
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
12
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
13
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
14
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
15
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
16
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
17
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
18
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
20
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा

पायपीट करुन विद्यापीठ गाठत विद्यावाचस्पती बनलेल्या ‘भूमिपुत्राचा’ ग्रामस्थांनी केला गौरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2019 12:35 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : तºहावद ता़ तळोदा येथील ग्रामस्थांनी गावाचे नाव उज्ज्वल करत पीएचडी मिळवणाऱ्या भूमिपुत्राचा महापरीनिर्वाण दिनाचे ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : तºहावद ता़ तळोदा येथील ग्रामस्थांनी गावाचे नाव उज्ज्वल करत पीएचडी मिळवणाऱ्या भूमिपुत्राचा महापरीनिर्वाण दिनाचे औचित्य साधून गौरव केला़ गावात अनेक वर्षात बसची सोय नसल्याने पायपीट करत शालेय व महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करत गावातील इतर विद्यार्थ्यांना प्रेरणा देण्याच्या उद्देशाने हा कार्यक्रम झाला़प्रा़डॉ़जितेंद्र भिमराव बागुल असे पीएचडी प्राप्त करणाºया भूमिपुत्राचे नाव असून गेल्या आठवड्यात त्यांना कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातून पीएचडी पदवी प्रदान करण्यात आली़ त्यांनी ए कम्पॅरिटीव्ह स्टडी आॅफ ह्युमन रिलेशनशिप इन द सिलेक्ट नॉव्हेल्स आॅफ अनिता देसाई अ‍ॅण्ड गीथा हरीहरन या इंग्रजी साहित्यावर आधारित विषयाचा अभ्यास करुन ही पदवी प्राप्त केली़तºहावद हे गाव गुजरात आणि शहादा तालुक्याच्या सिमेवर आहे़ गावातून १० वर्षापूर्वी वाहतूकीची साधने नसल्याने येथील विद्यार्थी शिक्षणासाठी प्रकाशा ता़ शहादा येथे पायी जावून शिक्षण घेत होते़ यातील एक विद्यार्थी म्हणून प्रा़ डॉ़ जितेंद्र बागुल हे परीचित आहेत़ दर दिवशी इतर विद्यार्थ्यांसोबतच पायपीट करणाऱ्यांपैकी जितेंद्र बागुल यांनी विद्यापीठातून पीएचडी मिळवल्याने ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला होता़ दरम्म्यान तºहावद येथील बौद्ध समाजातून प्रथमच पीएचडी प्राप्त केल्याने सर्वधर्मिय ग्रामस्थ तसेच नोकरीनिमित्त इतर शहरे व परराज्यात स्थिरावलेल्या बांधवांनी एकत्र त्याचा गौरव केला़ महापरीनिर्वाण दिनी डॉ़ बाबासाहेब आंबेडकर यांना श्रद्धांजली म्हणून हा उपक्रम झाला़ प्रारंभी ग्रामस्थांनी सामूहिक बुद्धवंदना केली़ यानंतर प्रा़ बागुल यांचा कुटूंबियांसह गौरव करण्यात आला़यावेळी गोविंद शिरसाठ, भरत शिरसाठ, आनंद शिरसाठ, देवानंद शिरसाठ, ईश्वर सामुद्रे, पोलीस पाटील सुनिल शिरसाठ, चतुर चित्ते, प्राचार्य भारती शिरसाठ, संजय निकुंभे, पूनमचंद सामुद्रे, सुनंदाबाई शिरसाठ, मायाबाई सामुद्रे, सविता शिरसाठ, शितल शिरसाठ यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते़